...'त्या' वादग्रस्त पोलीस निरीक्षकाची अखेर बदली

Image may contain: 1 person, smiling, sittingशिरुर, ता.२९ ऑगस्ट २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर पोलीस स्टेशनला काही महिन्यांपुर्वी रुजू झालेले पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांची अवघ्या सहा महिन्यांतच बदली झाली असून, त्यांच्या जागी नवीन पोलीस निरीक्षक रुजू झालेले आहेत.

शिरुर पोलीस स्टेशन तसं शिरुर तालुक्यातील महत्वाचं पोलीस स्टेशन.या पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांची बदली झाल्यानंतर त्यांची जागी (दि.२८फेब्रुवारी)रोजी पोलीस निरीक्षक म्हणुन नारायण सारंगकर यांची नियुक्ती झाली.शिरुर पोलीस स्टेशनला नियुक्ती झाल्यानंतर शिरुर शहरातील व शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या.माञ शिरुर शहरातील एकही समस्या त्यांच्या कार्यकाळात सोडविल्या गेल्या नाहीत.शिरुर शहरातील वाहतुक समस्या सोडविणे गरजेचे असताना त्या उलट फक्त एसटी बसेसना एकेरी मार्ग केल्याने प्रवाशांना मनस्ताप तर सहन करावाच लागला परंतु एसटीचे आर्थिक उत्पन्न ही बुडाले.त्यानंतर खडबडुन जाग येत हा एकेरी मार्ग पुन्हा सुरळित करण्यात आला. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई होणे गरजेचे असताना कोठेही मोठी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्याच बरोबर शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत बड्या धेंड्यांवर कारवाईचा उचललेला बडगा हा मोठा चर्चेचा विषय झाला होता.नुकतीच मांडवगण फराटा  येथे तरुणाला झालेली मारहान हि सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी हा विषय लावुन धरला होता. यांमुळेही सारंगकर यांच्याबाबत चर्चांना उधान आले होते. त्याचबरोबर अनेक तक्रारदार यांच्या वाढलेला रोष व साहेबांची ट्रिटमेंट देण्याची पद्धत यामुळे उघडपणे कोणीही बोलत नव्हते माञ जनतेत सारंगकर यांच्याबाबत उलट सुलट चर्चा होत्या. बदली व्हावी अथवा न व्हावी याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्यापर्यंत हा विषय गेलेला होता. शिरुर पोलीस स्टेशन विविध कारणांनी चर्चेत येत होते.

शिरुर पोलीस स्टेशनला सन २०१३ ते २०१४ या काळात ते शिरुर पोलीस स्टेशनला निरीक्षक म्हणुन नियुक्त झाले होते.परंतु तेव्हाही वादग्रस्त ठरल्याने अवघ्या सहा महिन्यांतच त्यांची बदली अन्यञ करण्यात आली होती.या नंतर चालु वर्षी फेब्रुवारी महिन्यात शिरुर पोलीस स्टेशनला नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच पुन्हा बदली झाली आहे.

शिरुर पोलीस स्टेशनला नुकतेच सारंगकर यांच्या जागी प्रविण खानापुरे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शिरुर पोलीस स्टेशनला कार्यभार ताब्यात घेतल्यानंतर शिरुरकर व शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी स्वागत केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या