तळेगाव ढमढेरे येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

तळेगाव ढमढेरे,ता.१ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे - रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातील गुणवंत व कर्तृत्वान अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तळेगाव ढमढेरे(ता.शिरूर) येथे आयोजित या कार्यक्रमात सुमन गायकवाड (तळेगाव ढमढेरे), संगीता इखर (रांजणगाव सांडस), सुवर्णा भालेराव (पारोडी), राधाबाई गवारे (विठ्ठलवाडी), सुनिता पोपळहार (उरळगाव), कोमल भुजबळ (तळेगाव ढमढेरे), वैशाली रणदिवे (रांजणगाव सांडस), अलका जांभळकर (उरळगाव), सुषमा सायकर (तळेगाव ढमढेरे), आशा मुळे (विठ्ठलवाडी), रूपाली माळी (रांजणगाव सांडस), सुजाता चव्हाण (निमगाव म्हाळुंगी), मनीषा शिंदे (आलेगाव पागा), शोभा ढमढेरे, जे.डी. शिरसाट, रूपाली मोरे व वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रज्ञा घोरपडे आदी उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, पंचायत समिती सदस्या अर्चना भोसुरे, सरपंच ताई सोनवणे, माजी उपसरपंच मोहिनी पिंगळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संदीप ढमढेरे, मच्छिंद्र भुजबळ, माजी उपसरपंच दिलीप  गवारे, वसंत भुजबळ, राहुल टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल म्हणाल्या की तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरच सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सुविधांचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनही केले. अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर मारणे यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या