मनसेचे गुरुवारपासुन विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

शिरुर,ता.१ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : नैसर्गिक ओढे,नाले यांच्यावर झालेले अतिक्रमण व इतर मागण्यांसाठी गुरुवार(दि.५) पासुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी सांगितले.

यासंदर्भात शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.त्यांनी याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि,नैोसर्गिक ओढे,नाले या संदर्भात शिरुर नगरपरिषदेकडे सातत्याने गेल्या तीन महिन्यांपासुन पाठपुरावा केला जात आहे.परंतु यावर कुठलेही ठोस पावले उचलले गेल्याचे निदर्शनास आले नाही.

नैसर्गिक ओढे नाले खुले करा,नैस्रगिक नाले व ओढे यांना संरक्षक भिंती तातडीने बांधाव्या,अतिक्रमण काढावे,यांवर सुरु असलेले बांधकामे तात्काळ थांबवुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच या ओढे नाले संबंधी तातडीने चौकशी लावावी या मागण्यासाठी मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करत असल्याचे घोगरे यांनी सांगितले.यावेळी मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे,मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे,वाहतुक सेनेचे रविंद्र गुळादे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या