ग्रामपंचायत सदस्यावर जीवघेणा हल्ला करणारा अटकेत

करडे, ता.२ सप्टेंबर २०१९ (प्रतिनीधी) : करडे (ता.शिरुर) येथील ग्रामपंचायत सदस्य अंकुश बांदल यांच्यावर दोघा तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना (दि.१) रोजी सायंकाळी घडली.

या हल्ल्यात अंकुश बांदल (रा.करडे) हे जखमी झाले आहे. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अंकुश बांदल यांचे करडे रस्त्यावर हॉटेल असून या हॉटेल जवळच रविवारी सायंकाळी त्यांच्यावर हल्ला झाला.हल्ल्याची माहिती कळताच स्थानिकांनी बांदल यांना शिरूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असुन सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा हल्ला का व कशातून झाला याबाबत कुठलीही माहिती अद्याप मिळाली नाही.

घटनेची माहिती शिरुर पोलीसांनी कळताच शिरुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.हल्ला झाल्यानंतर आरोपी पळून जात असताना त्याला स्थानिक नागरिकांनी पकडले व वेळीच शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे कर्मचा-यांसह घटनास्थळी पोचले व यातील आरोपी याला पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यामुळे आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले कुठला अनर्थ यावेळी झाला नाही.घटनास्थळी दौंड विभागाच्या पोलीस उपधीक्षक ऐश्वर्या शर्मा व पुणे ग्रामीणचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेतील हल्ला करणा-या आरोपीचे नाव समजू शकले नाही. अंकुश बांदल यांच्या गळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने असते.त्यांची परिसरात गोल्डनमॅन म्हणून ओळख आहे. त्यामुळे हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की अन्य कारणाने याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या