शिरुर शिवसेना तालुकाप्रमुखपदी सुधीर फराटे

Image may contain: 1 person, close-up and outdoorशिरुर,ता.२ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : शिरुर शिवसेना तालुका प्रमुखपदी घोडगंगा सहकारी कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

सुधीर फराटे हे राष्ट्रवादीचे कट्टर निष्ठावंत म्हणुन ओळखले जात होते.राष्ट्रवादीत नाराज असलेल्या फराटे यांनी काही दिवसांपुर्वी मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची कार्यकर्त्यांसमवेत भेट घेत हाती शिवबंधन बांधुन घेतले.त्यांच्या या पक्षप्रवेशाने शिरुर तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली होती.सुधीर फराटे हे मांडवगण फराटा सोसायटीचे संचालक असुन घोडगंगा कारखान्याचे संचालक म्हणुन काम पाहत आहे.घोडगंगा कारखान्याच्या कारभारावर व भ्रष्टाचारावर त्यांनी सोशल मिडियावर टाकलेला प्रकाश हा तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवसेनेच्या नव्या पदाधिका-यांच्या नव्याने नुकत्याच निवडी करण्यात आल्या.सुधीर फराटे यांना शिवसेना तालुकाप्रमुख म्हणुन काम करण्याची संधी देण्यात आली.काही दिवसांवर शिवसेना उपनेते व शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शिवसेनेत नव्या व तरुण चेह-यांना काम करण्यासाठी संधी देण्याचे काही दिवसांपुर्वी शिरुर येथे सुतोवाच केले होते.

यानिवडीनंतर बोलताना सुधीर फराटे यांनी पक्षाच्या ध्येयधोरणाप्रमाणे पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असुन पक्षाच्या माध्यमातुन तळागाळातील जनेतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या