अखेर दोन तासांच्या थरारनाट्यानंतर अट्टल गुन्हेगार जेरबंद

Image may contain: 6 people, sky, cloud, outdoor and natureशिरुर,ता.२ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : करडे (ता.शिरुर) येथील ग्रामपंचायत सदस्य अंकुश बांदल यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा चोरटा हा सराईत गुन्हेगार असुन ग्रामस्थ व पोलीसांनी दाखवलेल्या धाडसामुळे सुमारे दोन तास चाललेल्या थरारनाट्यानंतर अट्टल गुन्हेगाराला पकडण्यात यश आले असल्याची माहिती शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी पञकार परिषदेत दिली.

या प्रकरणी समीर करवंद्या काळे(वय.२९,रा.सोनगाव,ता.बारामती) असे पकडलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.याबाबत सविस्तर करडे(ता.शिरुर) येथे रविवार(दि.१) रोजी सायंकाळच्या सुमारास अंकुश बांदल यांच्यावर चोरीच्या उद्देशाने दोन व्यक्तींनी बजाज पल्सर या दुचाकीरुन येत अचानक धारदार शस्ञाने हल्ला चढविला.यात बांदल यांना पोटाला इजा झाली.अचानक झालेल्या या हल्ल्याने बांदल यांना काही क्षण काहीच सुचले नाही.परंतु तरीही त्यांनी सावरत धाडसाने एका चोरट्यावर प्रतिहल्ला केला.या हल्ल्याने सदरील चोरटा गंभीर जखमी झाला.गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या या चोरट्याने पळ काढला असताना काही ग्रामस्थही मागे लागलेले होते.अशा गंभीर अवस्थेत धावत असताना त्यातील चोरट्याने बाजरीत लपण्याचा आधार घेतला.यावेळी ग्रामस्थांनी तत्काळ शिरुर पोलीस स्टेशनला फोन करत घटनेची माहिती दिली.सदरील घटनेचे गांभिर्य लक्षात घेत शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी स्वत: पोलीस कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली.यावेळी बाजरीत लपलेल्या या सराईताला पकडण्यासाठी सरकारी वाहनावरील भोंग्याने शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु तरीही त्या चोरट्याने प्रतिसाद दिला नाही.यावेळी पोलीस निरीक्षक खानापुरे व सहकारी यांनी घटनास्थळाच्या विरुद्ध दिशेने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता,काही अंतरावर एका स्क्रॅप च्या खड्ड्यात आरोपीने स्क्रॅप अंगावर घेउन स्वत:ला गाडुन घेतले.

पोलीस निरीक्षक खानापुरे यांना जवळ गेले असता आरोपीला संशय आल्याने अचानक खड्ड्यातुन धारदार ह्त्यारांसह बाहेर येत पुन्हा पळण्याचा प्रयत्न केला.यावेळी आरोपीवर पिस्तुल रोखले व पुन्हा शरण येण्याचे आवाहन केले.यावेळी ग्रामस्थ व पोलीस कर्मचा-यांनी मोठ्या धाडसाने आरोपीला ताब्यात घेतले.या आरोपीने बांदल यांच्यावर हल्ला करताना स्वत:लाही गंभीर इजा झाली असल्याने पोलीसांनी आरोपीला ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.प्राथमिक उपचार केल्यानंतर सदरील आरोपीवर पुणे येथील ससुण रुग्णालयात आरोपीला पुढील उपचारांसाठी दाखल केले.करडे ग्रामस्थ,पोलीस व आरोपी यांच्यात सुमारे आठ किलोमीटर अंतर पाठलाग व दोन तास हा थरार नाट्य सुरु होते.परंतु ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस,पोलीस कर्मचारी राजेंद्र गोपाळे,अभिषेक ओहोळ,आकाश नेमाणे,बाळासाहेब हराळ यांनी आरोपीला पकडण्यासाठी दाखविलेले कौशल्य यांच्यामुळेच अट्टल सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश आले असल्याचे खानापुरे यांनी बोलताना सांगितले.या आरोपीवर सोलापुर ग्रामीण,पुणे ग्रामीण,सातारा आदी ठिकाणी गुन्हे दाखल असुन याबाबत तपास सुरु असल्याचे खानापुरे यांनी सांगितले.

चोरीत सात तोळे सोने लंपास...
अंकुश बांदल हे करडे परिसरात गोल्डमॅन म्हणुन प्रसिद्ध होते.तसेच ते ग्रामपंचायत चे सदस्य आहेत.त्यांच्यावर झालेला हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला असुन या चोरीत त्यांचे सात तोळे सोने लंपास झाले असल्याची माहिती खानापुरे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या