पोलिस भरती सुरू; पोलिस भरतीचे फॉर्म असे भरा...

No photo description available.
शिरूर, ता. 4 सप्टेंबर 2019 : राज्यातील लाखो तरुणांचे लक्ष लागलेली पोलिस भरती (Maharashtra Police Bharti 2019) अखेर जाहीर झाली. 3450 जागांसाठी ही भरती होणार असून, जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 3 सप्टेंबर 2019 ते 23 सप्टेंबर 2019 या काळात महापरीक्षा पोर्टलवर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

परीक्षा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केल्यानंतर महापोर्टलच्या माध्यमातून पहिल्यांदाच भरती होत आहे. मुंबईसाठी (Mumbai police recruitment 2019) सर्वाधिक 1076, तर त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी सर्वाधिक 720 जागांसाठी भरती होईल.

यावेळचा अभूतपूर्व बदल म्हणजे यावेळी लेखी परीक्षा अगोदर होईल आणि पात्र उमेदवारांनाच मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येईल. दरम्यान, या निर्णयाला विरोधही करण्यात आला होता. कारण, ग्रामीण भागातील या निर्णयामुळे मागे राहतील, असाही आरोप करण्यात आला होता.

लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीचे स्वरुप
लेखी परीक्षा पूर्वीप्रमाणेच 100 गुणांची असेल, ज्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी असेल. लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धीमत्ता आणि मराठी व्याकरण या घटकांचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला लेखी परीक्षेत (Mumbai police recruitment 2019) किमान 35 टक्के, तर मागास प्रवर्गातील उमेदवाराला 33 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. लेखी परीक्षेत एका जागेसाठी 10 या प्रमाणे मैदानी चाचणीसाठी संधी दिली जाईल.

मैदानी चाचणीतही मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. मुलांसाठीची मैदानी चाचणी 100 ऐवजी 50 गुणांची होईल. यावेळी मुलांच्या चाचणीत लांबउडी आणि पूलअप्सचा समावेश नसेल. 50 गुणांपैकी 30 गुणांसाठी 1600 मीटर धावणे, 10 गुणांसाठी 100 मीटर धावणे आणि 10 गुणांसाठी गोळाफेक असेल. तर मुलींच्या मैदानी चाचणीत 800 मीटर धावण्यासाठी 30 गुण, 100 मीटर धावणे 10 गुण आणि गोळाफेकसाठी 10 गुण असतील. लेखी परीक्षेतील 100 आणि मैदानी चाचणीतील 50 अशा 150 गुणांपैकी अंतिम निवड केली जाईल.

एसआरपीएफसाठी बदल नाही
राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) आणि भारत राखीव बटालियन (आयआरबी) या जागांसाठी 100 गुणांचीच मैदानी चाचणी होईल. 5 किमी धावणे आणि 100 मीटर धावणे याचाही यामध्ये समावेश आहे. एसआरपीएप आणि आयआरबीसाठी लेखी परीक्षा 100 आणि मैदानी चाचणी 100 या 200 गुणांमधून निवड केली जाईल.

उत्तीर्ण उमेदवारच मैदानी परीक्षेसाठी पात्र
राज्यात २०१९ मध्ये होणाऱ्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये गृह विभागाने मोठे अभूतपूर्व बदल केले आहेत. त्यानुसार ही परीक्षा होणार आहे. यामध्ये आता भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवारच मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहे. नव्या निर्णयानुसार पोलिस शिपाई सेवा प्रवेश २०१२ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

२००६ पासून नियमितपणे पोलिस भरती प्रक्रिया होत आहे. मात्र, यंदा पोलिस भरती प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नेहमी आढळणारा उत्साह यंदा दिसून येत नाही. याचे कारण म्हणजे ही परीक्षा महापोर्टलकडे देण्यात आली आहे. महापोर्टलमार्फत घेण्यात येणाऱया सार्वजनिक बांधकाम, वनविभाग आदी शासकीय परीक्षांचा अनुभव पाहता विद्यार्थ्यांमध्ये अनुत्साह आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. राज्यातून जवळपास ८ लाख उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.

https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice या वेबसाईटवर जिल्हानिहाय जाहिरात पाहता येईल.

कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा?

  1.     रत्नागिरी पोलिस भरती 2019 / Ratnagiri Police bharti 66
  2.     रायगड पोलिस भरती 2019 / Raigad Police bharti 81
  3.     पालघर पोलिस भरती 2019 / Palghar Police bharti 61
  4.     सिधुदुर्ग पोलिस भरती 2019 / Sindhudurg Police bharti 21
  5.     जालना पोलिस भरती 2019 / Jalna Police bharti 12th Pass 14
  6.     नंदुरबार पोलिस भरती 2019 / Nandurbar Police bharti 25
  7.     भंडारा पोलिस भरती 2019 / Bhandara Police bharti 22
  8.     कोल्हापूर पोलिस भरती 2019 / Kolhapur Police bharti 78
  9.     सोलापूर पोलिस भरती 2019 / Solapur Police bharti 76
  10.     पिंपरी चिंचवड पोलिस भरती 2019 / PCMC Police bharti 720
  11.     पुणे रेल्वे पोलिस भरती 2019 / Pune Railway Police bharti 77
  12.     पुणे ग्रामीण पोलिस भरती 2019 / Pune Gramin Police bharti 21
  13.     पुणे पोलिस भरती 2019 / Pune Police bharti 214
  14.     धुळे पोलिस भरती 2019 / Dhule Police bharti 16
  15.     जळगाव पोलिस भरती 2019 / Jalgaon Police bharti 128
  16.     मुंबई पोलिस भरती 2019 / Mumbai Police bharti 1076
  17.     सांगली पोलिस भरती 2019 / Sangli Police bharti 105
  18.     सातारा पोलिस भरती 2019 / Satara Police bharti 58
  19.     औरंगाबाद पोलिस भरती 2019 / Aurangabad Police bharti 91
  20.     नागपूर पोलिस भरती 2019 / Nagpur Police bharti 288
  21.     मुंबई रेल्वे पोलिस भरती 2019 / Mumbai Rail Police bharti 60
  22.     नवी मुंबई पोलिस भरती 2019 / Navi Mumbai Police bharti 61
  23.     ठाणे पोलिस भरती 2019 / Thane Police bharti 12th Pass 100

(यामध्ये नसलेल्या जिल्ह्यांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाईल)

फॉर्म कसा भराल? (Police bharti online form)
https://exams.mahapariksha.gov.in/registrationPolice या वेबसाईटवर गेल्यानंतर उमेदवाराला स्वतःचं अकाऊंट तयार करावं लागेल. अगोदरच अकाऊंट असल्यास युजरनेम आणि पासवर्ड वापरुन लॉग इन करता येईल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी REGISTER या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर स्वतःचं युजरनेम टाका, त्यानंतर मेल आयडी टाकून पासवर्ड व्हेरीफाय करा. रजिस्टर केल्यानंतर REGISTER यावर पुन्हा क्लिक करा. तुमचं अकाऊंट तयार होईल. पुन्हा तुम्ही होम पेजवर याल. तुम्ही तयार केलेलं युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. यानंतर पुढील सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करा. तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी तुमचं युजरनेम आणि पासवर्ड अचूकपणे लिहून ठेवा. शिवाय माहिती भरतानाही वाचून खात्री करा आणि मगच माहिती टाका.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या