शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीची पुरग्रस्तांना मदत

शिरुर, ता.६ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : शिरूर  कृषी बाजार समितीचे वतीने सांगली व कोल्हापुर येथील पुरग्रस्थांना नुकतीच आर्थिक मदत देण्यात आली.

सांगली व कोल्हापुर येथे झालेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक, वित्त स्वरुपात मोठा व न भरून येण्यासारखा फटका बसला.त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांची जनावरे देखील या महापुरात दगावली.सांगली व कोल्हापुर मधील नागरीकांना सामाजीक बांधीलकी म्हणुन शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सहकार विभागाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली.

यावेळी मदतीचा पंचवीस हजार रुपयांचा धनादेश बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांचे हस्ते सहाय्यक निबंधक हर्षित तावरे यांचेकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे, प्रविण चोरडीया, बंडु जाधव, सचिव अनिल ढोकले आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या