भावी पिढी घडविण्यात शिक्षकांचे मोलाचे योगदान : बांदल

तळेगाव ढमढेरे,ता.६ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांचे मोलाचे कार्य असुन शिक्षकांचे हे योगदान कधीही विसरता येणार नाही असे प्रतिपादन जि.प.सदस्या रेखा बांदल यांनी केले. 

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शक शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्ताचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शिक्षकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल बोलत होत्या.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यामुळे त्यांना प्रेरणा मिळते तसेच शाळेतून विद्यार्थी घडवण्याचे मोलाचे कार्य शिक्षक करत असतात. यावेळी विशेष सन्मान विजया चव्हाण यांचा करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.त्यातील तीन विद्यार्थी राज्यात झळकले हे काम कौतुकास्पद शिक्षिका करत असल्याचे बांदल यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा २ चे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियंका कुंभार, तसेच शाळा नंबर १ चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर आदक यांनी प्रस्ताविकात संपुर्ण शाळेचा आढावा मांडला.

तळेगाव ढमढेरे येथील शाळा नंबर १ मधील १७ विध्यार्थ्यांनी यश संपादन करून शिक्षक आणि शाळेचे नाव उंचावले आहे,  व शाळा नंबर २ मधील गुणवत्ता यादीतील मध्ये ७० विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे. त्यातील तीन विद्यार्थी राज्यात झळकले सर्व गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मार्गदर्शक शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण शेवकर होते, उपस्थित माजी उपसरपंच विजय ढमढेरे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पिंगळे, संतोष केदारी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सोनाली ढमढेरे, किरण ढमढेरे, सदस्य भगवान खुरपे, वैशाली वांढरे, सोनाली सादगिले, रामदास भुजबळ, पल्लवी खामकर, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षक पालक व ग्रामस्थ हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार विजय ढमढेरे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या