शिरुरला ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

शिरुर, ता. ७ सप्टेंबर २०१९ (प्रतिनीधी) : शिरुरनजीक सतरा कमान पुलाजवळ दुचाकीला ट्रॅक्टरची धडक बसल्याने एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

या अपघातप्रकरणी शंकर दामोदर नरवड (वय.३५, रा. पिसोळी, मुळ रा.गंगाखेड, जि.परभणी) यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादी यांचा भाचा संतोष गंगाधर बुडूकवड यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला आहे. याबाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व फिर्यादी यांचा भाचा संतोष हे (दि.६) रोजी पहाटे पाचच्या सुमारास गावी गंगाखेड येथे जाण्यासाठी डिस्कवर गाडी नं एम.एच.२२ वाय.७२९५ या दुचाकीवरुन जाण्यास निघाले होते.

शिरुर जवळ सतराकमान पुलाजवळ आले असताना अचानक नगर बाजूकडून शिरुर गावाकडे वळणारा ट्रॅक्टर एम.एच.१७ ए.इ.५८७१ हा वळाला. त्यावेळी ट्रॅक्टरची दुचाकीस धडक बसून दुचाकीवरील संतोष यास गंभीर मार लागला तर फिर्यादी यात जखमी झाले. या अपघात प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर जनार्दन मोरे (रा. मोरवाडी, ता.राहुरी, जि. अहमदनगर) यावर गुन्हा नोंदविला असून, शिरुर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सुरेश चौधरी हे अधिक तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या