शिरसगावला 'एक गाव एक गणपतीचे' यशस्वी आयोजन

Image may contain: 9 people, people standing and outdoorशिरसगाव काटा, ता. ७ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : शिरसगाव काटा (ता.शिरुर) येथे ग्रामस्थ व युवकांच्या सहकार्यातुन एक गाव-एक गणपती उपक्रम राबविण्यात आला असून, गावाने सलग दुस-या वर्षी असे अनोखे आयोजन करुन शिरुर तालुक्यात नवा आदर्श निर्माण केला आहे.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात गेल्या चार वर्षांपासुन सातत्याने दुष्काळाने ग्रासले असुन याही वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पाउस न पडल्याने दुष्काळाची चिन्हे आहेत.गावात वाद-विवाद होउ नये व एकोपा राहावा यासाठी एक गाव-एक गणपतीची संकल्पना गावातील ग्रामस्थांनी मांडली.त्यानुसार गावातील सर्व युवक,ज्येष्ठ, नेतेमंडळी यांची गणपती स्थापना करण्यापुर्वी एक बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकित सर्वानुमते अनावश्यक खर्च टाळुन संपुर्ण गावात केवळ एकच गणपती स्थापन्याबाबत सर्वांचे एकमत झाले.यास गावातील सर्व मंडळाच्या प्रमुखांनी व युवकांनी होकार दिला.त्यानुसार शिरसगाव काटा येथे अत्यंत साधेपणाने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.

हा उपक्रम राबविण्याचे शिरसगाव काटा ग्रामस्थांचे हे दुसरे वर्ष आहे. शिरुर तालुक्यात ठिकठिकाणी  व अनेक गावांनी चौका-चौकात गणपती स्थापना केली असुन शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील  ग्रामस्थांनी सर्वांच्या सहमतीने अनावश्यक खर्च टाळुन गावात केवळ एकच गणपती स्थापन केल्याने शिरुर तालुक्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.शिरसगाव काटाचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे पदाधिकारी,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,आजी माजी प्रमुख पदाधिकारी,युवक,सर्व मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आदी ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील सर्व तरुणांच्या सहकार्यातुन हा उपक्रम राबविण्यात आला असुन सर्वच ग्रामस्थ उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या