माजी आमदार अशोक पवार यांचे संचालकपद धोक्यात ?

Image may contain: 1 person, smiling, outdoorन्हावरे, ता.७ सप्टेंबर २०१९ (प्रतिनीधी) : न्हावरे (ता. शिरुर) येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची ५ एकर जमीन रावसाहेबदादा पवार एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेस दिल्याबद्दल व या संस्थेत कारखान्याचे चेअरमन यांचे प्रत्यक्ष हितसंबंध असल्याच्या कारणावरुन घोडगंगा कारखान्याचे चेअरमन अशोक पवार यांना प्रादेशिक सहसंचालक(साखर) यांनी संचालक पद रद्द का करु नये अशी नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती काकासाहेब खळदकर यांनी दिली.

याबाबत काकासाहेब खळदकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले कि,अशोक रावसाहेब पवार हे चेअरमन असताना त्यांनी पदाचा गैरवापर करुन कारखाना मालकीची कोट्यावधी रुपये किंमत असणारी पाच एकर जमीन रावसाहेबदादा पवार एज्युकेशन फाउंडेशन या खासगी संस्थेस कारखान्यास कोणताही मोबदला न घेता ९९ वर्षांच्या विनामोबदला कराराने सहकार खात्याच्या परवानगीशिवाय तबदील करुन गैरव्यवहार केलेला आहे.याबाबत संजय दत्ताञय बेंद्रे,व इतर सभासदांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.

या तक्रार अर्जानुसार विशेष लेखापरिक्षक(सहकारी संस्था-साखर) यांनी सविस्तर चौकशी अहवाल प्रादेशिक सहसंचालक(साखर) यांच्याकडे सादर केल्यानुसार,रावसाहेब पवार एज्युकेशन फाउंडेशन या विश्वस्त संस्थेची (दि.११-०९-२०१७) रोजी नोंदणी करण्यात आली. संचालक मंडळ सभा (दि.२-०८-२०१८) नुसार पाच एकर जागा (दि.१६-०८-२०१८) रोजी रजिस्टर दस्ताने विनामोबदला या संस्थेस भाडेकरार करुन दिली आहे. त्यास वार्षिक सभा (दि.२५-०९-२०१८) ठराव क्र.१०(१) नुसार कार्योत्तर मान्यता दिली आहे. सदर संस्थेत ५० विश्वस्त राहतील. अशोक पवार हे आजीव/तहहयात कायम विश्वस्त असुन त्यांना त्यांचा वारस नेमणुकीचा अधिकार आहे.सदर वारसास कायम विश्वस्त म्हणुन काम करण्याचा अधिकार आहे. तसेच विस्वस्त मंडळावर २९ विश्वस्त पाच वर्षे नेमण्याचा अधिकार आहे. व त्यांनी नेमलेला वारस सुद्धा सदर संस्थेचा तहहयात अध्यक्ष राहणार आहे. परंतु, कारखान्याच्या संचालक मंडळाचा कालावधी त्यांच्या संचालक कालावधी एवढाच राहणार आहे.

सदरची जमीन रावसाहेबदादा पवार एज्युकेशन फाउंडेशन ही विश्वस्त संस्था ९९ वर्षे विनामोबदला वापरणार आहे.या विश्वस्त संस्थेचे अशोक पवार हे तहहयात अध्यक्ष आहेत.व त्यानंतर त्यांनी नेमलेले वारस सदर संस्थेचे अध्यक्ष राहणार आहे.यावरुन अशोक पवार यांचे रावसाहेबदादा पवार एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेमध्ये प्रत्यक्षरित्या हितसंबंध गुंतलेले असल्याचे निरीक्षण प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग यांनी नोंदविले असुन अशोक पवार यांनी नियम ५७ मधील तरतुदींचे उल्लंघन करुन रावसाहेबदादा पवार पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना या संस्थेच्या हितसंबंधास बाधा येइल असे कृत्य केले आहे. सबब महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८अ(१)(ब) मधील तरतुदींनुसार कारखाना संचालक पदावरुन का कमी करण्यात येउ नये ? अशी नोटीस बजावण्यात आली आहे. सदर नोटीशीनंतर १५ दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करावा असे दिलेल्या नोटीशीत म्हटले असल्याचे काकासाहेब खळदकर यांनी माहिती देताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या