Video : एकदंत अर्बन मल्टीपलच्या माध्यमातून तत्काळ कर्ज

Image may contain: Nikhil Jagdale, textरांजणगाव गणपती, ता. 9 सप्टेंबर 2019 (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथे एकदंत अर्बन मल्टीपल निधी लिमिटेडचे आज (सोमवार) मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी ५ वा उदघाटन होणार असल्याचे संस्थापक/अध्यक्ष ऍड. बाळासाहेब शेळके यांनी सांगितले. एकदंत अर्बनच्या माध्यमातून ग्राहकांना वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

रांजणगाव गणपती येथे अनेक छोटे व्यावसायिक असून या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागते. परंतु बँकेतून कर्ज काढायचं म्हटले की, अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. बँकेत अनेकवेळा पाठपुरावा करुनही वेळेवर कर्ज उपलब्ध होत नाही. एकदंत अर्बन मल्टीपलच्या माध्यमातून छोट्या व्यावसायिकांना लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार असून, महिला बचत गटांना विशेष कर्जाची सोय करण्यात येणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या