'राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण'

तळेगाव ढमढेरे, ता. 10 सप्टेंबर 2019: राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले.

शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कोळसे पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे होते. या कार्यक्रमात निवृत्तीअण्णा गवारे (अध्यक्ष विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ विठ्ठलवाडी), अरविंददादा ढमढेरे (मानद सचिव शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे), सदाशिव पवार (बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर), जालिंदर शेलार (सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ नागरगाव), प्रकाश कुतवळ (अध्यक्ष ऊर्जा उद्योगसमूह) आदींचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर तालुक्यातील ५ मुख्याध्यापक, १३ शिक्षक व २ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही गुणवंत पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

तालुक्यातील २० उपक्रमशील शाळांना 'अब्राहम लिंकनचे मुख्याध्यापकांना पत्र' या फ्रेमचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, दिपाली शेळके, उपजिल्हाधिकारी संदिप कोकडे, शिरूर बाजार समितीचे अध्यक्ष शशिकांत दसगुडे, शिरूरच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, ग्राहक पंचायतीचे प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड, कांतीलाल गवारे, महेश ढमढेरे, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष जी.के. थोरात, कार्याध्यक्ष दादासाहेब गवारे, कृती समितीचे अध्यक्ष कल्याणराव बर्डे, गणपतराव तावरे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव रामदास थिटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात माहेर संस्थेच्या ल्युसी कूरियन व रविंद्र ढोबळे यांना देखील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब गवारे यांनी केले. संदीप सरोदे, धर्मेंद्र देशमुख व शारदा मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले तर माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष अशोक दरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या