'त्या' भाविकाचा मृतदेह पाहून अनेकजन हळहळले

No photo description available.रांजणगाव गणपती, ता.१० सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे अष्टविनायक महागणपतीच्या दर्शनासाठी रस्ता ओलांडून येताना कंटेनरने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची दुर्घटना सोमवारी (ता. 9) घडली. याबाबत भानुदास गरजे यांनी रांजणगाव पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,रांजणगाव गणपती येथे महागणपतीच्या कमानीसमोर पुणे-नगर रस्ता ओलांडताना अष्टविनायक यात्रा करणारे भानुदास भिसे या गणेशभक्ताला नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरने जोरात धडक दिली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. भानुदास गरजे व भानुदास भिसे (सध्या रा. शेवगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हे आपल्या पत्नींसह खासगी बसमधून अष्टविनायक यात्रा करीत होते. सोमवारी अष्टविनायक महागपतीच्या दर्शनासाठी सर्वजण जाताना पुणे-नगर रस्ता ओलांडताना भानुदास भिसे यांना कंटेनरने चिरडले आणि ते जागीच ठार झाले. कंटेनरचा चालक रामदेव खाटीक (रा. गोयाला, जि. अजमेर, राजस्थान) याला रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, भानुदास गरजे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावरून अनेक वाहने गेली. यामुळ मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. संबंधित मृतदेहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मृतदेह पाहून अनेकजण हळहळत होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या