आचारसंहिता लांबणीला अन् कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

Image may contain: 1 person, smilingशिरुर, ता.१२ सप्टेंबर २०१९ (सतीश केदारी) : विधानसभेच्या निवडणुकिच्या  पार्श्वभुमीवर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागु होण्याची शक्यता असल्याने नेत्यांची उद्घाटनांसाठी प्रचंड धावपळीने दमछाक होत आहे. तर कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

विधानसभेची निवडणुक तोंडावर आली असुन सर्वञ निवडणुकिची लगीनघाई सुरु असल्याचे चिञ दिसत आहे.शिरुर हवेलीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद,शिरुर हवेलीचे माजी आमदार अशोक,विदयमान आमदार बाबुराव पाचर्णे आदी इच्छुक असुन शिरुर हवेलीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद व विदयमान आमदार बाबुराव पाचर्णे यांनी एलईडी वाहनासह प्रचारही सुरु केला आहे.आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या कार्यकर्त्यांकडुन थेट गावोगावी घर ते दारोदार जाउन कार्यअहवाल देण्याचे काम अनेक दिवसांपासुन सुरु आहे.माजी आमदार अशोक पवार यांचाही प्रचाराचा झंजावात दिसुन येत आहे.

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने पवार,पाचर्णे,कंद यांचा उद्घाटनांचा धडाका सुरु आहे.यात गावोगावी असलेल्या कार्यकर्त्यांची माञ प्रचंड धावपळ होत असुन आधी उद्घाटन आमचेच झाले पाहिजे अशी भुमिका अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.

'श्रीं' बरोबर 'सौं'ची प्रचारयंञणा आघाडीवर
शिरुर हवेलीत अनेक नेत्यांबरोबरीने त्यांच्या सौभाग्यवतींनीही प्रचारात लक्षवेधी सहभाग ठरत आहे.शिरुर हवेलीचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालतीताई पाचर्णे,माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार,पुणे जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या पत्नी पुजाताई कंद, त्याचबरोबर जि.प.चे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल यांचा प्रचारयंञणेत सहभाग लक्षणीय ठरत असुन या मातब्बर नेत्यांच्या प्रचारयंञणा आगामी निवडणुकित येत्या काही दिवसांत निवडनुकित मोलाची भुमिका बजावणार आहेत.

पैलवानांची भुमिका अद्याप गुलदस्त्यात
शिरुर-हवेलीत ज्यांची प्रत्येक कार्यक्रमात गावच्या पारापासुन दिल्लीपर्यंत नेहमी चर्चा हि होतच असते असते असे पैलवान मंगलदास बांदल यांची भुमिका काय राहणार हे गुलदस्त्यातच असुन बांदल शिरुर-हवेलीत, कि शिरुर-आंबेगाव मध्ये धांदल कोणाची उडविणार याचीच चर्चा गावोगावी असुन त्यांची भुमिकाही मोलाची ठरणार आहे.त्यामुळे निवडणुकिचा धुराळा उडु लागला असुन उमेदवारी जाहिर झाली नसली तरी शिरुर हवेलीत नेत्यांनी प्रचार सुरु केला असुन आचारसंहिता लांबणीला अन कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला अशी अवस्था सगळीकडे आजतरी पहावयास मिळत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या