'हॉटेल विजय'चे संस्थापक लक्ष्मण कुंडलिक यांचे निधन

Image may contain: 1 personसरदवाडी,ता.१२ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : विजय हिंदु हॉटेलचे संस्थापक लक्ष्मण रामभाऊ कुंडलिक(वय.९२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात चार मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.ग्रामपंचायत सदस्या पुनम कुंडलिक यांचे ते आजोबा तर उद्योजक बाळासो,दत्ताञय,शिवाजी कुंडलिक तसेच माजी उपसरपंच विजय कुंडलिक यांचे ते वडिल होते.

अत्यंविधी आज गुरुवार(दि.१२) रोजी सरदवाडी(ता.शिरुर) येथे राञी ९ वाजुन ३० मिनिटांनी होइल.

Image may contain: 1 person, smilingपुणे-नगर महामार्गावर वाघोलीनंतर सर्वप्रथम शिरुर तालुक्यात हॉटेलच्या माध्यमातुन लक्ष्मण कुंडलिक यांनी ५० वर्षांपुर्वी व्यावसाय उभारलेला होता.त्यानंतर सुमारे ५० वर्षानंतरही सरदवाडीची प्रसिद्ध भेळ ही राज्यात सर्वञ प्रसिद्ध होती.सरदवाडी गावाचा नावलौकिक राज्यात होण्यास व गावच्या विकासात कुंडलिक यांचे मोठे योगदान होते.लक्ष्मण कुंडलिक हे भाउ या नावाने परिचित होते. सन १९३० साली भाउंचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपे या गावी झालेला.त्यानंतर सरदवाडी या गावात भाउ हे स्थायिक झालेले.मोठ्या कष्टाने त्यांनी सदरवाडी गावात व्यवसायाची सुरुवात केलेली.त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी साथ दिल्याने व्यवसायात उत्तुंग झेप घेतलेली.

त्यांच्या सुरुवातीच्या काळात अत्यंत हलाखीची परिस्थिती.लहान वयात पुण्यातही काही दिवस कष्ट केले.पुण्यातील आयुष्याच्या खडतर दिवसात अनेक कामे केली.जिल्हाधिकारी कार्यालय(सध्याची नुतनीकरण केलेली इमारत), जुनी जिल्हा परिषद इमारत, रेसकोर्स इमारत आदी ठिकाणी दगडांच्या बांधकामांची कामे केली. ससुन रुग्णालय यांसह रेसकोर्स ला सुमारे त्या काळी १०० खोल्यांची बांधकामे उभारण्यात भाउंचा मोठा वाटा होता.भाउंच्या निधनाने सरदवाडी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या