कदाचित बाप्पा धावुन आले नसते तर...

Image may contain: one or more people and outdoorशिरुर,ता.१३ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : शिरुर जवळ धावत्या बसचे एक चाक निखळुन पडल्यानंतरही बस काही अंतरावर धावत जाउन थांबली माञ दुसरे चाक निखळले असते तर मोठा अनर्थ घडला असता.

याबाबत सविस्तर असे कि,शिरुर शहरातुन जाणा-या जुन्या पुणे नगर रस्त्यावरुन पांढरकवङा - पुणे बस (क्र. एम एच 29 बीई 0807) ही पुण्याच्या दिशेने जात होती.शिरुर स्थानकावर थांबण्यासाठी ही बस गावातून जात असताना दुपारी एक च्या दरम्यान शिवशाही बसचे मागचे चाक निखळले.तशाही अवस्थेत बस काही अंतर पुढे गेली. दरम्यान प्रवाशांनी व बघ्यांनी आरडाओरड केल्याने बसचालकाने पोस्ट ऑफिसजवळ बस थांबवली.मागील दोन टायरपैकी एक चाक निखळले होते व एका चाकावर बस काही अंतर पुढे गेली.विद्याधाम प्रशालेजवळ या बसचे चाक निखळून गोल गिरक्या घेऊन पडले.मात्र बसचा  वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

विद्याधाम व परिसरात अनेक विदयार्थी, पालकांची या रस्त्यावर नेहमी गर्दी असते.गुरुवारी या रस्त्यावर गणेश विसर्जन असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता.अचानक बसचा अपघात घडला असताना व बसमध्ये चाळिस प्रवासी प्रवास करत असताना केवळ दैवबलवत्तर होते व संकटमोचक गणपती बाप्पा धावुन आल्याने मोठा अनर्थ टळल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या