वर्षा काळे यांना 'आदर्श सरपंच' पुरस्कार प्रदान

Image may contain: 13 people, people smiling, people standingशिरुर,ता.१३ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : तर्डोबाची वाडीच्या माजी सरपंच वर्षा फक्कड काळे यांना सन २०१७-१८ चा आदर्श सरपंच पुरस्कार समारंभपुर्वक राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला.

अल्पबचत भवन येथे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सरपंचाना आदर्श सरपंच पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जि.पचे अध्यक्ष विश्वासनाना देवकाते,उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील, महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके,बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने,पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार,जि.प सदस्य राजेंद्र जगदाळे,जि.प.सदस्या सविता बगाटे, माजी.जि.प.सदस्य राहुल पाचर्णे,पं.स. सदस्य आबा  सरोदे,माजी उपसरपंच संभाजी कर्डिले,रामलिंगचे सरपंच विठ्ठल घावटे,माणिकराव गावडे,फक्कड काळे,ग्रामसेविका लता चितळकर,ग्रामसेवक बाळासाहेब बेंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.

वर्षा फक्कड काळे यांनी सरपंचपदाच्या काळात भिल्ल व आदीवासी समाजातील कुटुंबातील जातीचे दाखले,पिठ गिरण्यादेण्या यांबरोबरच या परिसरासाठी पाणीपुरवठा योजना मंजुर करण्यात आली.गावात स्वखर्चाने बाके देण्यात आली.गावात वाचानालये सुरु करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.वृक्षलागवड,बंदिस्त गटार योजना त्याचबरोबर नाविन्यपुर्ण योजना तर्डोबाची वाडी गावात काळे यांनी राबविल्या.जलसिंचन व बंधारे या माध्यमातुन सर्वांगिण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले.त्यांच्या याच कार्याची दखल घेत पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने काळे यांना आदर्श पुरस्कार देण्यात आला आहे.त्यांना पुरस्कार देण्यात आल्यानंतर शिरुर शहर व पंचक्रोशीत माजी सरपंच वर्षा काळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या