शेतकरी आत्महत्या हा कृषीप्रधान देशाला लागलेला कलंक

Image may contain: 7 people, people smiling, people standingतळेगाव ढमढेरे,ता.१५ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : सत्तेपुढे व जनतेपुढे वास्तव मांडण्याचे काम हे साहित्यिक करत असतात. शेतकऱ्यांचे वास्तव जीवन मांडण्यास साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे. देशात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या हा कृषीप्रधान देशाला लागलेला कलंक असल्याचे मत कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केले.

तळेगाव ढमढेरे येथे शिरूर तालुका महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने  आयोजित पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन समारंभात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून चांदगुडे बोलत होते.या कार्यक्रमात माधुरी शेजवळ यांच्या भरारी काव्यसंग्रह व प्रेरणा लेखसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटक जि. प. सदस्या रेखा बांदल यांनी साहित्यिकांकडून राजकारण्यांना प्रेरणा मिळत असल्याचे मत  व्यक्त केले. तर विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे म्हणाले कि साहित्यिक समाजाचा आरसा असून सत्य मांडण्याचे धाडस करत असतो.

महाराष्ट्र साहित्य परिषद शिरुर तालुका शाखेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊ सन्मानित केले.यामध्ये डॉ.धनंजय लोंढे(वैदयकीय),रोटरी क्लब शिक्रापूर(सामाजिक), रघुनाथ शिंदे(कृषी),डॉ.रामचंद्र नऱ्हे(विज्ञान), उत्तमराव भोंडवे(प्रबोधन), बी.के.मोमीन(कला),प्राथमिक शिक्षक पतसंस्था शिरूर(सहकार), सुमित गुणवंत(साहीत्य),  माधुरी शेजवळ(शैक्षणिक) आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी पार पडलेल्या कविसंमेलनात आकाश भोरडे, सुमित गुणवंत, अरुण वाळुंज, संदीप वाघोले, जयसिंग नऱ्हे, नानासाहेब गावडे आदी कवींनी आपल्या रचना सादर केल्या.

या कार्यक्रमास जि.प.सदस्या रेखा बांदल, माजी पंचायत समिती सदस्या दिपाली शेळके, महेश ढमढेरे, प्राचार्य पांडुरंग गाडीलकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे,बाबा इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष शंकर नऱ्हे यांनी केले.कवी मनोहर परदेशी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन हर्षदा परदेशी यांनी केले तर  संभाजी चौधरी यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या