सभासदांनो...आपला घोडगंगा कारखाना वाचलाच पाहिजे

मांडवगण फराटा,ता.१५ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : घोडगंगा कारखान्याचा कारभार शिरुर तालुक्यातील सर्व सभासदांना समजावा यासाठी  "चेअरमन साहेब,उत्तर द्या" या  ३१ प्रश्नांच्या माध्यमातुन लेखाजोखा मांडला असुन घोडगंगा कारखाना वाचलाच पाहिजे या भुमिकेवर मी ठाम असल्याचे घोडगंगा कारखान्याचे संचालक व शिवसेनातालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार यांनी बोलताना सांगितले.

२१)चेअरमन साहेब आपल्या कारखान्यातील आपल्या कारखान्यातील अनेक कामगारांवर स्वत:च्या व्यक्तिगत आकसापोटी कारखान्याच्या पैशातुन गेली १५ वर्षापासुन कोर्टात केसेस चालु असुन त्यावर आपण सभासदांचे लाखो रुपये खर्च करताय हे खरे आहे काय?
उत्तर : चेअरमन साहेब आपल्या कारखान्यात आपण कामगारांची संघटना होउ दिली नाही.जो कामगार कामगारांची संघटना करेल त्यावर सत्तेचा गैरवापर करुन नोटिसा बजावल्या,त्याला निलंबित केले.कामावरुन काढुन टाकले,मानसिक ञास दिला.गणेगाव दुमाला,मांडवगणचे कर्मचारी जाणिवपुर्वक ञास देण्याच्या उद्देशाने त्यांची १०० कि.मी लांब टाकळी हाजी बेटातील शेवटच्या गावी बदली केली.विरोधातील कर्मचारी असेल तर त्याच्या योग्यतेपेक्षा खालचे काम दिले.अनेक कामगारांवर कामगार न्यायालय व इतर ठिकाणी केसेस दाखल केल्या.गेली १५ वर्षे हे कामगार स्वखर्चाने लढत आहे.परंतु सभासदांच्या पैशातुन कोर्टामध्ये कोट्यावधी रुपये खर्च केले.ही व्यक्तिगत आकसापोटी उधळपट्टी चालु आहे.

२२) चेअरमन साहेब,आपण खासगी कारखान्याच्या फायद्यासाठी घोडगंगा कारखान्यामार्फत जादा उसतोडणी व वाहतुक कंञाटदाराबरोबरच करार करता हे खरे आहे?
उत्तर : चेअरमन साहेब,आपल्या कारखान्यामार्फत उसतोडणी यंञणा भरताना आपल्या प्रतिदिन क्षमतेच्या १० ते १५% जादा क्षमतेची यंञणा असणे गरजेची असते परंतु आपण जवळपास ३० ते ५०% जादा उसतोड यंञणा भरतो.त्यामुळे अनेक वेळा दोन-दोन दिवस उसाची वाहने रांगेत थांबतात.सभासदांचा उस वेळेत गाळप न झाल्याने वजन कमी होते,साखर उतारा घटतो.सभासदांचे नुकसान होते.आपण आपल्या भाषणांमध्ये हुतात्मा,किसन आहेर कारखान्याच्या नियोजनाबाबत सांगत असतात.तेथिल सभासदांचा तुटलेला उस कमीत कमी ८ तास व जास्तीत जास्त २४ तासांत गाळपास येतो, मग आपले का नियोजन होत नाही.आपण जाणिवपुर्वक जादा यंञणा घोडगंगाच्या पैशाने भरुन आयती उसतोड यंञणा खासगी कारखान्याकडे पाठविले जाते.त्यामुळे सभासदांचे कोट्यावधींचे नुकसान होउन खासगी कारखान्याचा मोठा फायदा होतो.

२३)चेअरमनसाहेब,आपला कारखाना मागिल गळित हंगाम चालु असताना ३० पेक्षा जास्त वेळा बंद पडला.यामुळे सभासद व कारखान्याचे झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण ?
उत्तर : चेअरमनसाहेब,आपल्या कारखान्याने १९९९ ते २००९ या कालावधीत कार्यक्षमतेचे अनेक पुरस्कार मिळविले परंतु मागिल गळित हंगामात अनेक वेळा,अनेक तास कारखाना बंद राहिला.सभासदांना हे माहित असणे गरजेचे आहे कि कारखाना काही कारणास्तव थोडावेळ जरी बंद राहिला तर कारखान्याचे व सभासदांचे लाखोंचे नुकसान होते.चेअरमन साहेब,राजकारण व निवडणुका या नादात कारखान्यावर दुर्लक्ष झाले आहे.असे अनेक घटनांमध्ये दिसुन येते.त्यामुळे घोडगंगेच्या दुरवस्थेला फक्त तुम्हीच जबाबदार आहात.

२४)चेअरमनसाहेब,कारखान्यावर आपण एमपीएससी/युपीएससी व स्पर्धा परिक्षांकरिता  तयारी करणा-या युवकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देणार होता त्याचे काय झाले?
उत्तर : चेअरमनसाहेब,सन २०१५ च्या कारखाना निवडणुकीत तालुक्यातील युवकांसाठी कारखान्यामार्फत एमपीएससी/युपीएससी व स्पर्धा परिक्षांकरिता  तयारी करणा-या युवकांसाठी कारखाना स्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते.आपल्या तालुक्यातील तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज असताना त्या संदर्भात कारखानास्थळावर सुसज्ज ग्रंथालय होणे गरजेचे असताना आपली संचालक मंडळाची मुदत संपत आली तरी काहीही कार्यवाही झालेली नाही की आपण फक्त निवडणुकिपुरतेच तरुणांना भुलवत राहिला.आपण तालुक्यातील तरुणांचा विश्वासघात केलेला आहे.कारखाना प्रशासनाचा आपण अनेक ठिकाणी गैरवापर करत असता परंतु युवकांसाठी जर त्याचा वापर झाला असता तर आपल्या परिसरातुन चांगले मोठे अधिकारी घडले असते.

२५)चेअरमनसाहेब,आपल्या कारखान्याची ५ एकर जमीन दिलेल्या खासगी ट्रस्टचे तुम्ही तहहयात/अजीवन अध्यक्ष राहणार अशी घटना केली आहे.हे खरे आहे काय?
उत्तर : चेअरमनसाहेब आपल्या कारखान्याची ५ एकर जमीन दिलेल्या रावसाहेबदादा पवार एज्युकेशन फाउंडेशन ची आपण दि.११-०९-२०१७रोजी धर्मदाय आयुक्त यांचेकडे नोंदणी केली.कारखान्याची निवडणुक दरपाच वर्षांनी होत असते.सुमारे २० हजार कारखान्याचे सभासद आहेत.कुणाला संचालक करायचे हा अधिकार सभासदांचा आहे परंतु आपण संचालक/सभासद यांना अंधारात  ठेवुन संस्था रजिस्टर केली.लोकशाहीने दर पाच वर्षांनी सभासदांना सामोरे जाणे गरजेचे असताना सदर शैक्षणिक सुद्धा तशी रजिस्टर करणे गरजेचे होते.जो घोडगंगेचा चेअरमन असेल तोच संस्थेचा अध्यक्ष असेल परंतु आपण तसे न करता कारखान्याची /सभासदांच्या मालकीची कोट्यावधी रुपये किंमतीची जमीन बळकाविण्याकरिता सदर ट्रस्ट चे तहहयात अध्यक्षपद तुमचेकडे घेतले.त्यावर वारस नेमण्याचा अधिकार सभासदांकडे न देता तुमच्याकडेच ठेवला.वारससुद्धा तहहयात राहिल याची तरतुद करुन संपुर्ण सभासदांचा केसाने गळा कापलाय.आम्ही ठेवलेल्या विश्वासाचा मोठा घात केलाय हे आपणास दिलेल्या नोटीशीत उघड झालयं.

२६) चेअरमनसाहेब,आपल्या कारखान्याची ५ एकर जमीन दिलेल्या खासगी ट्रस्टमध्ये तुम्ही कारखान्याचे संचालक सोडुन इतर २९ लोक संचालक म्हणुन ट्रस्टवर घेतलेत हे खरे आहे काय?
उत्तर : चेअरमनसाहेब आपल्या कारखान्याची ५ एकर जमीन दिलेल्या खासगी ट्रस्टमध्ये सभासदांनी निवडुन दिलेले संचालक मंडळच पदसिद्ध संचालक म्हणुन असणे गरजेचे असताना तुम्ही निवडुन आलेल्या संचालकांना दुय्यम स्थान देउन सदर ट्रस्टमध्ये मनमानी करण्यासाठी व्यक्तिगत हिताचे निर्णय करण्यासाठी इतर २९ लोकांना संचालक म्हणुन घेतले.सदर २९ संचालकांना निवडण्याचा अधिकार सभासदांना देणे गरजेचे असताना आपण स्वत:कडेच ठेवला.२० हजार सभासदांना कुठलाच अधिकार ठेवला नाही.आपण हा अधिकार सभासदांना देणे गरजेचे असताना स्वत:कडेच ठेवला.हा सभासदांचा मोठा विश्वासघात आहे.हे तालुक्यातील सभासद व कारखाना हिताचे नाही.आपण लोकशाही मानत नाही का केवळ गप्पा मारता ?

२७)चेअरमनसाहेब,आपल्या कारखान्याची ५ एकर जमीन खासगी ट्रस्टला देताना सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांची मान्यता का  घेतली नाही ?
उत्तर : चेअरमनसाहेब,आपल्या कारखान्याची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार(दि.२५-९-२०१८) रोजी कारखाना स्थळावर पार पडली.सभेच्या कार्यक्रम पञिकेवर १० विषय होते.परंतु या विषयात आपल्या कारखान्याची ५ एकर जमीन विना मोबदला ९९ वर्षांच्या कराराने रावसाहेबदादा पवार एज्युकेशन फाउंडेशन या खासगी ट्रस्टला देण्याचा विषय सभासदांना दिलेल्या नोटीशीत नव्हता.आपली सर्वसाधारण सभा पार पडत असताना अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय घेतले जातात.परंतु ऐनवेळी येणा-या विषयात हा सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आलेला नाही.मग आपण सर्व संचालक व सभासदांची फसवणुक करुन तशी ठराव झालेची खोटी कागदपञे तयार केलेचे दिसुन येते.सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाचा हा चुराडा झाला आहे.तुम्ही सभासदांना का अंधारात ठेवले याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे.

२८)चेअरमनसाहेब २०१८/१९ ला सोमेश्वर ने ३३०० रु दर जाहिर केला आणि घोडगंगेने २५२० रु असे का? घोडगंगाच्या सभासदांना टनाला ७८० रु कमी का ?मागील हंगामाचा विचार करता सभासदांचा ४१ कोटी ३० लाखांचा तोटा याची जबाबदारी घेणार का?
उत्तर : चेअरमनसाहेब, आपला घोडगंगा कारखान्याने २०१८/१९ गळित हंगामात आतापर्यंत एफआरपी कायद्याने देणे बंधनकारक असते ती २५२० रु.प्रतिटन रक्कम सभासदांना दिलेली आहे.ती देतानाही २४ कोटी ७२ लाख रुपये एमएससी बॅंकेचे केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन अंतर्गत ७%टक्के व्याज सरकार भरणार आहे.त्याला हमी केंद्र सरकारची आहे.सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ९०टक्के उस गाळप २६५ या उस जातीचे करतो.परंतु तरीसुद्धा त्यांचा साखर उतारा आपलेपेक्षा जास्त आहे.त्यांनी ३४०० रु.बाजारभाव जाहिर केला आहे.आपलेपेक्षा त्यांचा बाजारभाव ७८० रु.जास्त आहे.मागिल गळित पाहता आपल्या सभासदांचे ४१ कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.याला फक्त तुम्हीच जबाबदार आहात.सोमेश्वरकडे को-जन डिस्टीलरी आहे.आपलेकडेही को-जन आहे.डिस्टीलरी प्रकल्प कर्जमुक्त झालेचे आपण को-जन उद्घाटनावेळी जाहिर केले आहे.त्यामुळे बाजारभाव मिळण्याचा सभासदांना अधिकार आहे.

२९) चेअरमनसाहेब आपल्या कारखान्याचा २०.५ मेगावॉटचा को-जन प्रकल्प व आपल्या कारखान्याची ३.५ मेगावॉट वीज निर्मिती क्षमता अशी २४ मेगावॉट क्षमता असताना मागील हंगामात सरासरी रोज किती मेगावॉट वीज तयार झाली?
उत्तर : चेअरमनसाहेब आपल्या कारखान्यात गतवर्षी आपण २०.५ मेगावॉट प्रकल्पाचे उद्घाटन केले.तसेच २.५ मेगावॉटचे टर्बाईन असे २३ मेगावॉटची आपली उर्जा निर्मितीची क्षमता आहे.मागिल हंगामात आपला कारखाना १३० दिवस चाललाय.२३ मेगावॉट म्हणजे ताशी २३००० युनिट * २४ तास =५,५२,००० युनिट प्रतिदिन वीज तयार होत आहे.कारखाना चालण्यासाठी १,२०,००० युनिट वापरात येणार आहे.उर्वरित ४,३२,०००युनिट विक्रीसाठी उपलब्ध होणे अपेक्षित आहे.शासनाने प्रतियुनिट ४.९९ दराने वीज खरेदी केली आहे.त्यानुसार आपल्या कारखान्याला ४,३२,०००युनिट * ४.९९ पैसे दर= २१,६०,००० रुपयांची वीजविक्री होणे अपेक्षित आहे.आपण अनेकवेळा आपला को-जन प्रकल्प यशस्वीपणे चालु असलेचे जाहिर केले आहे.त्यामुळे मागील हंगामातील १३० दिवस कारखाना चालु होता म्हणजे २१,६०,००० *१३० =२८ कोटी आठ लाख उत्पन्न अपेक्षित आहे.खर्ज वजा जाता निव्वळ उत्पन्न २० कोटी धरले तरी सभासदांना ४०० रु.प्रतिटन को-जन मधुन बाजार मिळणे आवश्यक आहे.

३०) चेअरमनसाहेब,आपला कारखाना दहा वर्षांपुर्वी माळेगाव कारखान्याच्या बरोबरीचा बाजारभाव देत होता.परंतु गळित हंगाम २०१८/१९ मध्ये आपला बाजारभाव २५२० रु.व माळेगावच बाजारभाव ३५५०रु.असा १०३० रु.चा फरक का?
उत्तर : चेअरमनसाहेब,आपला बाजारभाव २५२०,माळेगावचा ३५५० यात १०३०चा फरक आहे.म्हणुन १०३० * ५,३०,०००टन उस गाळप = ५४ कोटी ५९ लाख रुपये आपल्या सभासदांना कमी मिळालेत.चेअरमन साहेब स्थापनेपासुन घोडगंगा आपल्या ताब्यात असताना मग आत्ताच हि वेळ का आली?

३१)चेअरमन साहेब आपल्या कारखान्यातील मयत सभासदांचे किंवा संमतीने शेअर्स हंस्तांतरणाचे अनेक प्रस्ताव दाखल आहेत.गेली  अनेक वर्ष आपण जाणिवपुर्वक नवीन युवकांना घोडगंगाचे सभासद केलेले नाही.काही ठराविक लोकांना आपण सभासद करुन घेतलय असे का ?
उत्तर : चेअरमनसाहेब,आपल्या कारखान्याचे सभासदस्यत्व घेताना अनेक शेतक-यांनी त्यावेळी पै-पै गोळा करुन कर्ज घेउन,सोने मोडुन सभासदांचे पैसे भरलेत अडचणींच्या काळात त्या काळातील सर्व संस्थापक संचालक मंडळाने अहोराञ कष्ट करुन दारोदार फिरुन अनेक लोकांना सभासद केले.लोकांनी विश्वास ठेउन सभासदत्व घेतले.अनेक सभासदांच्या नावावर दोन-दोन शेअर्स आहेत.सभासद मयत झालेस किंवा जादा असलेला शेअर्स कुटुंबातील नवीन तरुणांच्या वारसांच्या नावावर करणेसाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन प्रस्ताव आपल्याकडे सादर केलेले आहेत.अनेक सभासदांनी ५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत प्रस्ताव सादर केलेले असताना आपण जाणिवपुर्वक नवीन युवकांना घोडगंगेचे सभासद करुन घेतले नाही.वारसाहक्काने सभासद होणे त्यांचा हक्क असताना आपण तो डावलत आहात.त्यामुळे युवक निश्चितच येत्या काळात योग्य भुमिका घेतील.दुसरीकडे तुम्ही शैक्षणिक ट्रस्ट मध्ये तुमच्या पुढील पिढीसाठी वारस नेमण्याचा अधिकार स्वत:कडे ठेवताय.सभासदांच्या ख-या वारसदारांना त्यांच्या हक्कापासुन वंचित ठेवताय.तुमच्या जवळचा माणुस अर्ज केल्यानंतर लगेचच सभासद होतोय याची माझ्याकडे माहिती आहे.तरी आपण या वारसांना लवकरात लवकर सभासद करुन घ्यावे.
(समाप्त)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या