गोल्डमॅन अंकुश बांदल हल्लाप्रकरणाचा गुंता वाढला

No photo description available.शिरुर,ता.१७ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : करडे(ता.शिरुर) येथील ग्रामपंचायत सदस्य अंकुश बांदल यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी शिरुर पोलीसांनी यापुर्वी दोन आरोपींना अटक केली होती तर या हल्ल्याचा कट रचलेप्रकरणी अन्य दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन या आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी पञकार परिषदेत दिली.

दरम्यान या दोन फरारी आरोपींपैकी एक आरोपी हा निलंबित पोलीस कर्मचारी असल्याची चर्चा आहे.याबाबत माहिती देताना खानापुरे यांनी सांगितले कि,अंकुश बांदल यांचे करडे रस्त्यावर हॉटेल असून या हॉटेल जवळच त्यांच्यावर (दि.१) रोजी सायंकाळच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने हल्ला झाला होता.या चोरीत अंकुश बांदल यांचे सात तोळे लंपास झाले होते व बांदल हे गंभीर जखमी झाले होते. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने शिरुर पोलीसांनी जखमी आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले होते.तर दुस-या आरोपीस गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले होते.

या गुन्हयाचा तपास करताना शिरुर पोलीसांना अन्य दोन आरोपी निष्पन्न झाले असुन हे दोघेही फरार आहे.सदर गुन्हयातील पहिला आरोपी समिर उर्फ बोतल करवंद्या काळे(वय.२९,रा.सोनगाव,ता.बारामती)याच्यावर ससुन रुग्णालयात उपचार केल्यानंतर पोलीसांनी त्यास अटक केली व सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे तर दुसरा आरोपी अमोल विश्वास ओव्हाळ याला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.या गुन्हयाचा सखोल तपास सुरु असुन पोलीस लवकरच अन्य आरोपींना अटक करणार असल्याचे शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी सांगितले.दरम्यान या गुन्हयातील आरोपी हा पोलीस खात्यातील निलंबित कर्मचारी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या