शिरुर तालुक्यात पारदर्शक कारभाराला प्राधान्य

Image may contain: 1 person, sitting and indoorशिरुर,ता.१७ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात महसुल विभागात कुठलाही भ्रष्टाचार खपवुन घेतला जाणार नसुन पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणार असल्याचे शिरुरच्या नवनियुक्त तहसिलदार लैला शेख यांनी सांगितले.
काही महिन्यांपुर्वी रुजु झालेले गुरु बिराजदार यांची प्रशासकिय बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी लैला शेख यांनी तहसिलदार म्हणुन पदभार स्विकारल्यानंतर पञकारांशी संवाद साधला तसेच तालुक्यातील समस्या जाणुन घेतल्या.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि,शिरुर तालुक्यातील नागरिकांची गैरसोय व होणारी फरफट थांबविण्याचा प्रयत्न केला जाणार असुन प्रत्येक मंडलाधिकार कार्यालय व शिरुर तहसिलदार कार्यालय या ठिकाणी तक्रारपेटी ठेवली जाइल.या माध्यमातुन जनतेच्या अपेक्षा,सुचना व तक्रारी यांची स्वत: दखल घेतली जाणार आहे.तालुक्यात अवैध वाळु चोरी करणा-यांवर कडक कारवाई करणार आहे.भ्रष्टाचार करणा-या,गैर काम करणा-या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.शिरुर तहसिल इमारतीच्या स्वच्छतेबाबत योग्य ती कार्यवाही करणार असुन जातीचे दाखले,रेशनकार्ड व इतर दाखले वेळेत मिळावे यासाठी निवडणुकिनंतर जास्तीत जास्त लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान गुरु बिराजदार यांनी शिरुर तालुक्यात अवैध वाळु वाहतुकीवर बसवलेला वचक,केलेल्या कारवाया यामुळे जनतेत समाधान असले तरी त्यांची अल्पावधीत झालेली बदली हा तालुक्यात मोठा चर्चेचा विषय झाला आहे.त्यामुळे नवीन नेमणुक झालेल्या तहसिलदारांपुढे शिरुर तालुक्यातील वाळु चोरी थांबविणे हे मोठे आव्हान असणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या