धानोरेत माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ग्रंथालय सुरू
धानोरे,ता.१८ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : धानोरे येथील जि. प. प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांनी पुस्तके देऊन ग्रंथालयाचे उद्घाटन केले.
धानोरे (ता. शिरूर) येथील माजी विद्यार्थ्यांनी शाळेत ग्रंथालय सुरू करण्याचा संकल्प केला व त्याचाच एक भाग म्हणून शाळेला विविध प्रकारची २७१ पुस्तके देऊन उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर शिंदे होते. माजी विद्यार्थी बाबुराव भोसुरे, संजय भोसुरे, नीलम ढोकले, प्रवीण भोसुरे, बाबासाहेब भोसुरे, विजय भोसुरे, विठ्ठल दरेकर, निलेश ढमढेरे व योगेश ढमढेरे आदींनी शाळेची गरज ओळखून ग्रंथालयाची स्थापना केली व पुस्तके भेट दिली.
दरवर्षी नवनवीन पुस्तके देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास संभाजी भालेराव, निलेश चकोर, तलाठी अशोक बढेकर, माजी उपसरपंच बाबुराव भोसुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती कामठे यांनी केले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.