Video: 'घोडगंगेेे'ला आग लागलीच कशी ?

न्हावरे,ता.१९ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखान्यात आग लागुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.यावर शिरुर तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

शिरुर तालु्कयातील महत्वाचा समजला जाणारा रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला बुधवार(दि.१८) रोजी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.अचानक लागलेल्या आगीने उग्ररुप धारण केले.आग लागल्याचे समजताच घोडगंगा कारखान्याचे कर्मचारी, अग्निशामक यंञणेने धाव घेउन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.सुमारे तासाभरात आगीवर पुर्णपणे नियंञन मिळवता आले,यामुळे मोठा अनर्थ टळला.या आगीत बगॅसचे मोठया प्रमाणात नुकसान झाले तर व बगॅस वाहुन नेणारा बेल्ट या आगीत जळुन खाक झाला.

दरम्यान आगीची घटना समजताच शिरुर तालुक्यात चर्चांना उधान आले आहे.विधानसभेची तोंडावर आलेली निवडणुक,घोडगंगा कारखान्याच्या जमीनीवर असलेली सुनावणी यावर शिरुर तालुकयात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु असुन आग लागलीच कशी असा  सवाल घोडगंगा कारखान्याचे संचालक सुधीर फराटे इनामदार यांनी केला असुन याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या