आमच्या माणसाची तब्बेत ठिक नसल्याचे म्हणाले अऩ्...

Image may contain: 7 people, people standing, tree, outdoor and natureशिक्रापूर, ता. २३ सप्टेंबर २०१९ (प्रतिनीधी) : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करुन खंडणी मागून लुटणारे आरोपी पुणे ग्रामीण गुन्हेशाखेने अटक केली असल्याची माहिती पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदाम शंकर पोपळघट (रा.वाळुंज एमआयडीसी, औरंगाबाद) हे दि.२७.०८.२०१९ रोजी त्यांच्याकडील टिआगो कार नं एम.एच.२०,इ.जी.३८७७ ने औरंगाबादकडे जात होते. शिक्रापूर जवळ आले असताना चहाच्या टपरीवर चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना, आमच्या माणसाची तब्बेत ठिक नाही असे म्हणत नगरपर्यंत नेण्याची विनंती केली. यावेळी गाडीत बसून जात असताना गाडी अहमदनगर शहराजवळील टोल नाक्याच्या पुढे गाडी थांबून त्यांनी फिर्यादी सुदाम पोपळघट यांच्यावर चाकूने वार करुन त्याचे हात-पाय बांधून तोंडावर व डोळयावर रुमाल बांधून ते पळून जाउ नये यासाठी मांडीवर वार करुन जखमी केले. यानंतर आरोपींनी फिर्यादी यांचा लॅपटॉप, रोख रक्कम, मोबाईल, एटीएम कार्ड घेउन त्यांचे अपहरण करुन त्यांना पाथरी, जि.परभणी येथे सोडून कारसह निघून गेले.

या गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेत गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी तपासाची सुञे वेगाने फिरवली. विविध गुन्हे शोध पथके आरोपींच्या तपासासाठी रवाना केली होती.या वेळी तपास करत असताना आरोपी अमोल मुंडे (कोयाळ, ता. धारुन, जि. बीड), महादेव गडदे (रा.चिंचकडी, ता.आंबेजोगाई, बीड), गणेश जाधव (कोयाळ, बीड) यांनी केला असल्याची व हे आरोपी वंजारवाडी, जि. बीड) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने धाडसाने कारवाई करत आरोपी पळून जाउ लागले असताना सुमारे ३ कि.मी.पाठलाग करत ताब्यात घेतले. यातील आरोपी अशोक मुंडे  याचेवर केज पोलीस स्टेशन, युसुफ वडगाव, अंबेजोगाई, शिरसाळ जि. बीड) या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असून शिक्रापुर पोलीस स्टेशनला वाहनचोरीचा गुन्हा दाखल आहे.

या आरोपींना पकडण्याकामी गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्ताञय गुंड, यांसह दत्ताञय गिरमकर, दत्ताञय जगताप, दयानंद लिमन, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, विजय कांचन, उमाकांत कुंजीर, रउफ इनामदार, राजू मोमीन, जनार्दन शेळके, धिरज जाधव, बाळासाहेब खडके यांनी ही कामगिरी केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या