शिरूर विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Image may contain: textशिरूर, ता.२३ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) :  शिरूर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 20 सप्टेंबर 2019 पासून अचारसहिता चालू झाली आहे तर 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती शिरूर विधानसभेचे निवडणूक अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूक काळामध्ये आचारसंहितेचे कडेकोट पालन प्रत्येक उमेदवार यांनी करावे आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी सांगितले.

शिरूर विधानसभा मतदार संघासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार लैला शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे हर्षद तावरे उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या