वृक्ष संवर्धनाने जपल्या वडिलांच्या 'स्मृती'

Image may contain: 9 people, people smiling, people standing and outdoorसरदवाडी, ता.२३ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : आपल्या वडिलांच्या स्मृति आयुष्यभर जतन रहाव्यात म्हणून वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष वाटप करण्यात येऊन वृक्षसंवर्धनाचा संदेश सरदवाडी (ता.शिरुर) येथील कुंडलिक कुटुंबाने दिला.
              
सरदवाडी, (ता.शिरुर) येथील विजय हिंदु हॉटेलचे संस्थापक लक्ष्मण रामभाऊ कुंडलिक यांच्या शनिवारी, दि.२१ रोजी झालेल्या दशक्रिया विधीनिमित्त आपल्या वडिलांच्या सामाजिक योगदानाबद्दल स्मृति कायमस्वरूपी रहाव्यात म्हणून स्मृतिप्रित्यर्थ कुंडलिक परिवाराच्या वतीने येथील स्मशानभूमी परिसरात बेलाच्या झाडाचे रोपण करण्यात आले.तसेच उपस्थित नागरिकांना प्रत्येकी एक याप्रमाणे पाचशे बेलाचे झाड उपस्थितांनाभेट देण्यात आले.                        

यावेळी आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अँड अशोक पवार, सूर्यकांत पलांडे, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, माजी उपसभापती वाल्मिकराव कुरुंदळे, सदस्य आबासाहेब सरोदे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, नाणेकरवाडीचे सरपंच शशिकांत नाणेकर, विष्णू महाराज केंद्रे, शिरुर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड निनाद मगर, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष बाबूराव पाचंगे, धरमचंद फुलफगर,सरपंच विलास कर्डिले,लहू भालेकर, अरुण घावटे, माजी उपसरपंच विजय कुंडलिक,मोहन नवले,सोन्याबापू दसगुडे, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक इंद्रभान सरोदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.उद्योजक दत्तात्रय कुंडलिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या