'राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण'

Image may contain: 36 people, people smiling, people standing
रांजणगाव गणपती, ता. 24 सप्टेंबर 2019 : शिक्षणामुळे माणूस घडतो त्यामुळे राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हाधिकारी व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे  शिक्रापूर रोटरी क्लबच्या वतीने आयोजित 'नेशन बिल्डर अवार्ड ' कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रांजणगाव गणपतीचे सरपंच सर्जेराव खेडकर होते. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिरूर तालुक्यातील ३० गुणवंत शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तु.म.परदेशी, महागणपती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, शिरूर बाजार समितीचे संचालक राजेंद्र गावडे, शिक्रापूर रोटरीचे संस्थापक अध्यक्ष वीरधवल करंजे, माजी अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गायकवाड, विद्यमान अध्यक्ष मयूर करंजे, उपाध्यक्ष मनोहर परदेशी, सचिव प्रीतम शिर्के, रमेश भुजबळ, विवेकानंद फंड, कविता खेडकर, नारायणी फंड, प्राचार्य रामदास थिटे, प्रा. संजीव मांढरे, प्रा. संजय देशमुख,  माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब गवारे, धर्मेंद्र देशमुख, तालुकाध्यक्ष अशोक दरेकर, शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, माजी अध्यक्ष विठ्ठल शितोळे, माजी सचिव मारुती कदम, शिरूर-हवेली शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, कार्याध्यक्ष प्रविण जगताप, शिक्षक परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.एन.बी. मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात शिक्रापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष मयूर करंजे यांनी रोटरीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व शिरुर तालुक्यातील शाळांनी त्यांच्या गरजेनुसार रोटरीच्या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रीतम शिर्के यांनी केले. मनोहर परदेशी यांनी सूत्रसंचालन केले तर विवेकानंद फंड यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या