शिरुरला शनिवारी चर्मकार समाजाचा मेळावा

शिरुर,ता.२५ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : शिरुरला रौप्यमहोत्सवानिमित्त भव्य चर्मकार समाजाचा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे संचालक विजेंद्र गद्रे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि,राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त शनिवार(दि.२८) रोजी भव्य चर्मकार समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन यात नवनियुक्त उच्चपदस्थ अधिका-यांचा सत्कार केला जाणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक पवार हे उपस्थित राहणार आहेत.

तर या कार्यक्रमाला आमदार बाबुराव पाचर्णे,माजी आमदार पोपटराव गावडे,सुर्यकांत पलांडे,प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल,बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे,लिडकॉम चे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे,नगराध्यक्षा वैशाली वाखारे,ग्राहक संरक्षणचे माजी अध्यक्ष  सुर्यकांत गवळी,राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद गवळी,चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदाम लोखंडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दरवर्षी शिरुर तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.त्याचप्रमाणे विविध क्षेञात उल्लेखनिय कार्य करणा-यांचा गौरव करण्यात येतो.शिरुर तालुक्यातील व राज्यातील चर्मकार समाजबांधव एकञ येण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असुन शिरुर तालुक्यातील सर्व चर्मकार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विजेंद्र गद्रे यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या