राष्ट्रवादीचे तिकिट बाप्पू कि दादांना मिळणार ?

Image may contain: 2 people, people smiling, textशिरुर, ता.२६ सप्टेंबर २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर-हवेलीत विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचं तिकिट कोणाला मिळणार यावर जोरदार चर्चा होत आहे.

विधानसभेसाठी आदर्श आचारसंहिता लागु झाली असुन निवडणुकिचा बिगुल वाजला आहे. अद्याप जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याने आघाडी व युतीच्या उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आलेली नाही. तीन ते चार दिवसांत उमेदवारांची अंतिम यादी जाहिर करण्याची दाट शक्यता असून, शिरुर हवेलीत सर्वाधिक उत्सुकता ताणली गेली आहे ती राष्ट्रवादी कॉंग्रेसचं तिकिट कोणाला मिळणार यावर.

भाजपाचे आमदार बाबुराव पाचर्णे हे युती झाल्यानंतर युतीचे उमेदवार असणार आहे. पाचर्णे यांची उमेदवारी जवळजवळ फायनल झाली असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे माजी आमदार अशोक पवार हे जरी प्रबळ दावेदार असले तरी पुर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्यावर माञ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला अंतिम क्षणी निर्णय घेणे अवघड जाणार आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना शिरुर हवेलीत केलेली विकासकामे हे जमेची बाजु असुन निवडणुकिपुर्वीच नव्हे तर गेल्या दिड वर्षात शिरुर हवेलीत  त्यांनी प्रचंड कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. प्रचार यंञणाही सक्षम केली असुन गावोगावी त्यांचा थेट संपर्क आहे.त्यांचा शिरुर हवेलीतील वाढलेला दांडगा जनसंपर्क, केलेली विकासकामे, सर्वसामान्यांशी असलेली नाळ,नवा चेहरा याच्या जोरावर प्रदिप कंदांना उमेदवारी मिळतेय का याकडे शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रदिप कंद समर्थकांनी सोशल मिडियावर तिकिटाबाबत पोस्ट केल्यानंतर चर्चांना उधान आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या