कबड्डी स्पर्धेत वाघेश्वरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Image may contain: 23 people, people smilingमांडवगण फराटा, ता.२७सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : दावडी (ता.खेड) येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील खेळाडूंनी १७ वर्षे मुलांच्या गटात विजय संपादन केला.

शिरूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असताना या संघाने पुरंदर संघाविरुद्ध अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात विजय खेचून आणला. या विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख दादासाहेब उदमले यांनी दिली.शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा, उपाध्यक्ष चंद्रकांत बाफना, शालेय समितीचे अध्यक्ष चंदुलाल चोरडिया, सचिव तु. म. परदेशी, सहसचिव बाबासाहेब चोरमले, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश फराटे, पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष अमोल जगताप, मुख्याध्यापक एस. टी. गद्रे, उपमुख्याध्यापक सुनिल थोरात, पर्यवेक्षक रघुनाथ हांडे यांनी स्पर्धेतील यशस्वी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक यांचे अभिनंदन केले.
         
पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दावडी (ता.खेड) येथील श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालयामध्ये जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये मांडवगण फराटा संघाने सुंदर खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाकडे विजयश्री खेचून आणली.या संघाने वेल्हे, हवेली, खेड आणि पुरंदर या संघांना पराभूत केले.विजयी संघांमध्ये भरत मोरे, विराज खराडे, श्रीनिवास कदम, शिवरत्न शितोळे, तुषार कुंभार यांनी उत्कृष्ट खेळ केला. अभिजीत खाकाळ, निखिल इथापे, धीरज फराटे, संकेत फराटे, कुणाल जांबले, समर वाबळे या खेळाडूंनी ही चांगली कामगिरी केली.सर्व यशस्वी खेळाडूंना दादासाहेब उदमले, मल्‍हारी उबाळे, मिलिंद निंबाळकर, नितीन गवळी, विजय कराळे, पवन ढवळे यांनी मार्गदर्शन केले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या