शिरुरला पुणे स्टेशन रुबी हॉल मार्गे एसटी बसेस येणार

Image may contain: outdoorशिरूर,ता.२७सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : अहमदनगर रस्त्याने पुणे येथील  शिवाजीनगर बसस्थानकाकडे जाणा-या सर्व एस.टी.बसेस रुबी हॉल पुणे स्टेशन मार्गे नेण्यात याव्यात अशी मागणी केल्यानंतर एस.टी.प्रशासनाच्या वतीने तत्काळ दखल घेण्यात आल्याची माहिती माजी नगरसेविका ॲड.माया गायकवाड यांनी दिली.

शिरुर येथील  माजी नगरसेविका ॲड.माया गायकवाड यांनी सांगितले कि,शिरूर अहमदनगर भागातून येणा-या एस.टी.बसेस पुणे स्टेशन मार्गे शिवाजीनगरला न जाता बंडगार्डन पुलावरून जात असल्याने पुणे स्टेशनकडे जाणा-या प्रवाश्यांची मोठी कुंचबणा होत होती. याबाबत शिरुरच्या प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल राज्य परिवहन महामंडळाकडे या एस.टी बसेस पुणे स्टेशन मार्गाने शिवाजी नगर कडे न्याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे आगारप्रमुख महेंद्र माघाडे यांच्याकडे केली होती.या मागणीची दखल घेत या मार्गाने बसेस नेण्याच्या तशा सूचना एस.टी प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.एस टी प्रशासनाच्या या निर्णयाचे शिरुर शहरातील अनेक प्रवाशांनी स्वागत केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या