किसान क्रांतीचे नितीन थोरात यांचा शिवसेनेत प्रवेश

शिरूर, ता.२७ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे  महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष  व एक जून २०१७ च्या किसान क्रांतीच्या शेतकरी संपाचे समन्वयक नितीन थोरात यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

Image may contain: 13 people, people sitting and indoorनितीन थोरात हे शिरुर तालुक्यात शेतक-यांच्या प्रश्नांसाठी गेल्या अनेक दिवसांपासुन लढा देत आहे.किसान क्रांतीच्या एक जुन च्या राज्यव्यापी शेतकरी संपात त्यांची भुमिका महत्वपुर्ण होती.शिरुर तालुक्यात त्यांचे आमदाबाद,मलठण व परिसरात बयुवकांचे व शेतक-यांचे मोठे संघटन आहे.किसान क्रांतीचे समन्वयक म्हणुन काम पाहत होते.

नितीन थोरात यांनी किसान क्रांतीचे संदिप गिड्डे,लक्ष्मण वंगे, राजाराम पाटील, अतिश गरड,महेश राणे,युवराज सुर्यवंशी  यांनी व त्यांच्यासह इतरांनी मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत हाती शिवबंधन बांधुन घेत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.यावेळी त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नांबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गो-हे,शिवसेनेचे खासदार विनायक राउत आदी उपस्थित होते. 

पक्षप्रवेशानंतर नितीन थोरात यांनी बोलताना सांगितले कि,शेतकर्यांच्या व शेतमजूरांच्या हितासाठी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या