बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा पण...

Image may contain: 8 people, people smiling, people standing, child and outdoor
शिरूर, ता. 30 सप्टेंबर 2019 (तेजस फडके): शिरूर तालुक्यात बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण, विविध गावांमध्ये तुरळकच बैलांची संख्या दिसून आली. बैलांची जागा टॅक्टरने घेतल्यामुळे विविध घरांमध्ये फक्त मातीचे बैल दिसत होते.

२० ते २५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मोठया प्रमाणात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. त्यावेळेस एका कुटुंबाकडे कमीत कमी ५० एकरच्या पुढे शेतजमीन असायची. त्यावेळेस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्त नसल्याने एका कुटुंबात कमीत कमी ४ ते ६ बैल असायची. नांगरट, कुळव, पेरणी हि सर्व शेतीची काम बैलांच्या साह्याने केली जायची. ज्वारी, बाजरी ही सगळी पिक खळ्यात केली जायची. मागील काही वर्षात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतजमीन मर्यादित झाली. शिरुर तालुक्यात औद्योगिक वसाहत आल्याने शेतजमिनी संपादित झाल्या. यांत्रिकीकरण वाढल्याने बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली. बैलगाडा शर्यती बंद झाल्याने बैल सांभाळायला शेतकरी असमर्थ ठरु लागले.

Image may contain: 6 people, people smiling, tree, outdoor and closeup
शेतकऱ्यांच्या दारातली आज सर्जा-राज्याची बैलजोडी दिसेनासी झाली. आजही अनेक काम करण्यासाठी शेतकऱ्यांना बैलांची आवश्यकता भासत आहे. परंतु, बैलांना चारा खायला घालणं परवडत नसल्याने शेतकरी बैल पाळत नाहीत. त्यामुळं दिवसेंदिवस बैलपोळ्याला बैलांची संख्या कमी होत आहे. वाढत्या यांत्रिकीकरणा मुळे शेतकऱ्यांच्या दारात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने बैलांची संख्या दिवसेंदिवस मोठया प्रमाणात घटत असल्याचे चित्र यावेळेस पहायला मिळाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या