वाद घोडगंगेच्या तिरावर पण चर्चा माञ सोशल मिडियावर...

Image may contain: 4 peopleन्हावरे, ता.३० सप्टेंबर २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाल्याने पुणे जिल्ह्यात या चिखलफेकीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना तालुक्यातील सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय.अत्यंत ज्वलंत विषय घेउन यावर्षीची वार्षिक सर्वसाधारण सभा गाजली ती सभेत झाल्याने गदारोळाने.शिरुर तालुक्यातील घोडगंगा कारखान्याची वार्षिक सभा दरवर्षी पार पडत असते.त्यात सभेपुढे असणारे इतिवृत्त वाचन करुन सभेचे कामकाज सुरु केले जाते.त्यात ऐनवेळी येणारे विषय व विषय पञिकेवर असणा-या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते.महत्वाच्या विषयांवर चर्चा करुन मंजुरी घेतली जाते.

गेल्या चार वर्षांच्या झालेल्या सभा पाहता या वर्षीची सभा हि ऐतिहासिक होती.निवडणुकिचे बिगुल वाजलेले असताना राजकिय वातावरण हे तापु लागलेले होते.त्याचप्रमाणे नुकताच घोडगंगा कारखान्याला आग लागल्याने तोही सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.गेल्या वर्षभरात घोडगंगेच्या कारभारावर नाराज असलेल्या घोडगंगेचे संचालक सुधीर फराटे यांनी बंडाचा पविञा घेत २१ संचालकांमधुन बंड करत थेट घोडगंगेचे चेअरमन यांच्यावर वेळोवेळी निशाना साधलेला होता.त्याचप्रमाणे सोशल मिडियाच्या माध्यमातुन चेअरमन साहेब उत्तर द्या असे म्हणत विचारलेले ३१ प्रश्न हे सुद्धा महत्वाचे होते.त्यानंतर यावरुन तालुक्यात ठिकठिकाणी केलेली पोस्टरबाजी ही सुद्धा चर्चेचा विषय झाला होता.

घोडगंगेच्या कारखान्यावर चेअरमन असताना अशोक पवार यांनी ५ एकर जमीनीच्या मुद्द्यावरुन प्रादेशिक सहसाखर संचालक यांनी पवार यांना दिलेली कारणे द्या नोटीस यांसह तालुक्यातील उसाचा बाजारभाव हे सर्व मुद्दे असल्याने यावर्षीची सभा वादळी होणार असल्याची चर्चा होती.घोडगंगेची सर्वसाधारण सभा सुरु झाल्यानंतर काही वेळातच गोंधळाला सुरुवात झाली.यात अनेकांनी घोषणाबाजीस सुरुवात केली.यात अनेकदा हमरीतुमरीवर कार्यकर्ते आले होते.तर पदाधिकारी अन कार्यकर्त्यांमध्येही माईक ओढण्यावरुनही वाद सुरु असल्याचे अनेकांनी पाहिले.या गदारोळात प्रचंड घोषणाबाजी,वाद पहायला मिळाले तर पोलीसांना माञ कार्यकर्त्यांना सावरता सावरता नाकी नउ येत होते.वाद घोडगंगेच्या कार्यस्थळावर पण चर्चा माञ सोशल मिडियावर असे घडताना दिसत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या