शिरुर-हवेलीत आमदार बाबूराव पाचर्णे परत...

Image may contain: 1 person, smiling, standing and glassesशिरुर, ता.१ ऑक्टोबर २०१९(सतीश केदारी) : शिरुरचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांना शिरुर हवेली १९८ विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीकडुन अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

शिरुर हवेली १९८ विधानसभा मतदारसंघासाठी गेल्या अनेक दिवसांपासुन उमेदवारी बाबत तर्क-वितर्क लढविले जात होते.त्याचप्रमाणे सोशल मिडियावर अफवाही पसरवल्या जात होत्या.परंतु तरीही आमदार बाबुराव पाचर्णे यांची उमेदवारी ही पक्षाकडुन फिक्स मानली जात होती.त्याचप्रमाणे नुकतीच महाजनादेश याञा उरुळी कांचन येथे आली असताना मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनीही अप्रत्यक्षपणे पाचर्णे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे सुतोवाच केले होते.

मंगळवार(दि.१) रोजी भारतीय जनता पार्टीकडुन अधिकृत उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्धीपञकाद्वारे जाहिर करण्यात आली.यामध्ये शिरुर मधुन विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.तर शेजारच्या श्रीगोंदा तालुक्यातुन मधुन बबनदादा पाचपुते,कर्जत जामखेड मधुन राम शिंदे,चिंचवड ला लक्ष्मण जगताप,भोसरीला महेश लांडगे,वडगाव शेरीला जगदीश मुळिक यांसह अनेक दिग्गजांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, भारतीय जनता पार्टीने उमेदवारी अर्ज जाहिर करत पुन्हा काम करण्याची संधी दिली असुन या माध्यमातुन पक्षाचे व पक्षातील सर्वांचे आभार मानत असुन गुरुवार(दि.३) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संकेतस्थळाचे वृत्त खरे ठरले
शिरुर तालुक्यातील संकेतस्थळ शिरुर तालुका डॉट कॉम ने भाजपाचे उमेदवार आमदार बाबुराव पाचर्णे यांनाच पक्षाकडुन उमेदवारी मिळणार याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.अखेर ते वृत्त खरे ठरले.

फटाके फोडून स्वागत
शिरुरचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांना उमेदवारी जाहिर होताच शिरुर शहरातील कार्यकर्त्यांकडुन फटाके फोडुन व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या