टाकळी हाजीत विजेचा शॉक लागून शेतक-याचा मृत्यू

टाकळी हाजी, ता.१ ऑक्टोबर २०१९ (प्रतिनीधी) : टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

बाप्पु अप्पा सोदक (वय.४९ रा.टाकळी हाजी) असे दुर्दैवी मृत्यु झालेल्या शेतक-याचे नाव आहे. तर या प्रकरणी कैलास विठ्ठल सोदक यांनी शिरुर पोलीस स्टेशनला माहिती दिली आहे. सविस्तर माहिती अशी कि,बाप्पु सोदक हे सकाळी विदयुत पंप चालु करण्यासाठी नदीवर गेले होते.यावेळी इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागला.हि माहिती कळताच स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात व त्यानंतर शिरुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.परंतु उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता.

बाप्पु सोदक हे टाकळी हाजी परिसरात चांगल्या व सुस्वभावाने परिचित होते.त्यांच्या निधनाची वार्ता कळताच परिसरात शोककळा पसरली.त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या