शिरुरला इच्छुकांनी मंगळवारपर्यंत नेली ४८ नामनिर्देशनपञे

शिरुर,ता.१ अॉक्टोबर २०१९(प्रतिनीधी) : शिरुर-हवेली १९८ विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवार(दि.१) पर्यंत सुमारे ४८ नामनिर्देशनपञे इच्छुक उमेदवारांनी नेली असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली.

शिरुर हवेली विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला असुन शुक्रवार (दि.२७) पासुन अर्ज स्विकारणे सुरु करण्यात आले आहे.शुक्रवारी सहा नामनिर्देशनपञे उमेदवारांसाठी नेण्यात आली होती.त्यानंतर शनिवार व रविवार हा सुट्टीचा दिवस होता.मंगळवार(दि.१) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस,भाजपा,शिवसेना,मनसे,अपक्ष असे सुमारे १५ नामनिर्देशनपञे इच्छुक उमेदवारांनी नेली आहेत.तर आज मंगळवार अखेर एकुण ४८ नामनिर्देशनपञे नेण्यात आली आहेत.

दरम्यान,मंगळवारी आमदार बाबुराव पाचर्णे यांना भाजपाकडुन यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली असुन बुधवार(दि.२) रोजी महात्मा गांधी जयंती असल्याने सरकारी सुट्टी असल्याने गुरुवार(दि.३) रोजी आमदार बाबुराव पाचर्णे,माजी आमदार अशोक पवार हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दाट शक्यता आहे.तसेच प्रमुख पक्षांची उमेदवारांची यादीही जाहिर होणार असल्याने इच्छुक उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी व शुक्रवारी मोठी गर्दी होणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या