शिरुरच्या आजी-माजी आमदारांवर इतके आहे कर्ज...

Image may contain: 2 people, people smiling, close-upशिरुर,ता.४ अॉक्टोबर २०१९(सतीश धुमाळ) : राष्ट्रवादी कॉंग्रेस चे उमेदवार अशोक पवार यांच्यावर १ कोटी १६ लाख इतके कर्ज आहे तर भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यावर ९ कोटी ८० लाख इतके कर्ज असल्याची माहिती निवडणुक शाखेने दिली.

शिरुर हवेली १९८ विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाकडुन उमेदवारी अर्ज(दि.३) रोजी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला तर भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार बाबुराव पाचर्णे यांनी भारतीय जनता पार्टीकडुन शक्तिप्रदर्शन करत निवडणुक निर्णय यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार ॲड अशोक पवार यांनी निवडणुक शाखेत संपत्तीचे दिलेल्या विवरणात पवार यांच्या नावे स्थावर मालमत्ता ३ कोटी ९३ लाख ६०११२ एवढी आहे तर त्याच्या पत्नी सुजाता पवार यांचे नावे ५ कोटी ७३ लाख ७७१३० रुपये एवढी आहे तर जंगम मालमत्ता १ कोटी ४० लाख ४३३१४ अशोक पवार यांच्या नावे तर पत्नी सुजाता पवार यांच्या नावे १ कोटी २४ लाख ८३६० रु एवढी आहे तर पवार परिवारा कडे इनोव्हा क्रेस्टा हे चारचाकी वाहन आहे.अशोक पवार यांच्या कडे १२० तोळे सोने आहे व चांदी १० किलो आहे त्यांच्या पत्नी कडे २० तोळे सोने व चांदी ५ किलो आहे.माजी आमदार अशोक पवार यांच्या वर १ कोटी १६ लाख ५६४१३ रुपयांचे तर पत्नी सुजाता यांच्यावर ७६ लाख ५५८२ रु चे कर्ज आहे.

भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांनी निवडणुक शाखेत संपत्तीचे दिलेल्या विवरणात पाचर्णे यांचे नावे स्थावर मालमत्ता ३४ कोटी ७९ लाख ३३९३० इतकी आहे तर पत्नी मालती यांचे नावे ७ कोटी १२ लाख १८ हजार एवढी मालमत्त्ता आहे पाचर्णे यांच्या नावे जंगम मालमत्ता ८ कोटी ५१ लाख १८८२० इतकी आहे तर पत्नी मालती यांच्या नावे १कोटी ९१ लाख ९३९१७ एवढी आहे. तर आमदार पाचर्णे यांच्या नावे फोर इन्डिव्हर हे चारचाकी वाहन तर पत्नीचा नावे ट्र्क्टर आहे.पाचर्णे यांच्या कडे १५ तोळे तर पत्नी मालती यांच्या कडे ४० तोळे सोने आहे.आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यावर ९ कोटी ८० लाख ७२७३६ रु चे कर्ज तर पत्नी चा नावे १ कोटी ९९ लाख ८०५१९ रुचे कर्ज आहे.
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या