उमेदवारी अर्ज छाननीत तीन उमेदवारांचे अर्ज बाद

Image may contain: textशिरुर,ता.५ अॉक्टोबर २०१९(सतीश केदारी) :  शिरुर-हवेली १९८ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुक प्रक्रिया सुरु असुन दाखल केलेल्या १८ उमेदवारी अर्जांपैकी ३ अर्ज छाननीत बाद झाले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली.

शिरुर हवेली १९८ विधानसभा मतदारसंघासाठी शिरुर तहसिल कार्यालयात विशेष निवडणुक कक्षात(दि.३०) पासुन  उमेदवारी अर्ज स्विकृती प्रक्रिया सुरु झाली होती.त्यानंतर (दि.४) ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटच्या मुदत होती.त्यामुळे(दि.४) पर्यंत शिरुर हवेलीतील १८ इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्याकडे सादर केले.

शनिवार(दि.५) रोजी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया घेण्यात आली.यावेळी जि.प.च्या पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार,शिरुर नगरपरिषदेचे नगरसेवक नितीन पाचर्णे,रोहिदास उंद्रे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला.या छाननी प्रक्रियेत उर्वरित १५ अर्ज वैध ठरविण्यात आले.सोमवार(दि.७) पर्यंत उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी मुदत आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या