शिरुरमधून मंगलदास बांदल, प्रदीप कंद यांची बंडखोरी

Image may contain: 2 people, people smiling, closeup
शिरूर, ता. 7 ऑक्टोबर 2019: शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदीप कंद, मंगलदास बांदल यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरीचा फायदा भाजपला होणार की राष्ट्रवादीला फटका बसणार याबाबत चर्चा परिसरात रंगू लागल्या आहेत.

बांदल यांनी आंबेगाव-शिरूर मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर कंद यांनी शिरूर-हवेलीमधून. मात्र, दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. परंतु, बंडखोरी केल्यामुळे राजकारणाचे चित्र बदलणार आहे.

राष्ट्रवादीकडून कंद, बांदल व डॉ. चंद्रकांत कोलते या तीन जणांनी बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादीची बंडखोरी रोखण्यात यश आल्यास पवार व पाचर्णे यांच्यात चुरशीची लढत होईल. दरम्यान, शिरूर-हवेलीमधून भाजपकडून बाबूराव पाचर्णे तर राष्ट्रवादीकडून डॉ. अशोक पवार हे उमेदवार आहेत. बंडखोरीमुळे कोणत्या उमेदवाराला फायदा होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 2014 निवडणुकीत पवार व पाचर्णे यांच्यातच दुरंगी लढत झाली होती. शहरी मतदानाचा टक्का वाढल्याने ती मतेही विजयासाठी महत्वाची ठरणार आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या