...अन संकटातही दोस्त आला दोस्तासाठी धावून

Image may contain: 2 peopleशिरुर, ता.७ ऑक्टोबर २०१९(सतीश केदारी) : प्रत्येक अडचणीत अन प्रसंगात साथ देतो तोच खरा मिञ असे म्हणतात परंतु जे फक्त राजकारणाच्या पलीकडेही मैञीसाठी प्रसिद्ध आहे, अशा त्या मिञाने दोस्ती, यारी, दुनियादारी करत याही वेळी मिञासाठी मैञी निभावली आहे.

मंगलदास बांदल व प्रदिप कंद राजकारणातील जोडगोळी. प्रदिप कंद हे पुणे जिल्हा.परिषदेचे अध्यक्ष होते तेव्हा मंगलदास बांदल हे बांधकाम सभापती होते.शिरुर हवेलीत विकासकामे करताना या जोडगोळीची वेगळीच स्टाइल अनेकांनी पाहिली. जि.पचे अध्यक्ष असताना कंद यांनी शिरुर तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून ते हवेलीतील प्रत्येक वाडी-वस्ती विकासकामांच्या माध्यमातुन संपर्क वाढलेला. शिरुर तालुक्यात सर्वसामान्यांची अनेकांची कामे केली तर बांदल यांनीही निधी देण्यास कमीपणा दाखवला नाही. दोघेही मैञीसाठी तितकेच प्रसिद्ध.

बांदल हे शिरुर तालुक्यात नव्हे तर जिल्हयात कुठेही सुखदुखाचा प्रसंग त्यात सामिल होणार.अगदी शिरुर पासुन जुन्नर पर्यंत युवकांची वेगळीच फळी त्यांच्या पाठीशी उभी असते.त्याचप्रमाणे कंद यांनी कार्यकर्त्याचा फोन आला कि आपुलकिने विचारपुस करत मदत लागली तर सांग असे म्हणत मदत ही करायचे.राजकारणापलीकडे माणसांचा संग्रह असणारी हि दोन्ही राजकारणातील जोडी वेगळीच.

जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांना तिकिट वाटपात पक्षाने डावल्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला अचानकपणे बांदल यांनी कंदासोबत हजेरी लावली.इतकेच नव्हे तर वाघोली येथील मेळाव्यातही बांदल यांनी प्रदिप कंद यांची पाठराखन चौफेर टिकाही केली. त्यामुळेच अडचणीतही मिञासाठी दोस्ती,यारी,दुनियादारी निभावत बांदल यांनी मैञी कशी निभवायची या निमित्ताने दाखवुन दिली आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा सोमवार हा शेवटचा दिवस असल्याने कंद व बांदल यांची भुमिका निर्णायक ठरणार आहे.   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या