शिरुर-हवेलीच्या निवडणूकीत १० उमेदवार रिंगणात

Image may contain: sky and outdoorशिरुर,ता.७ अॉक्टोबर २०१९(सतीश केदारी) : शिरुर-हवेली १९८ विधानसभा मतदारसंघात  उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १५ उमेदवारांपैकी ५ जणांनी अर्ज माघार घेतल्याने दहा उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.तर अर्ज माघार घेण्याच्या दिवशी जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके हे मातब्बर उमेदवार निवडणुकिच्या रिंगणातुन बाहेर गेले आहेत.

शिरुर हवेली १९८ विधानसभा मतदारसंघासाठी (दि.४) पर्यंत एकुण १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.उमेदवारी अर्ज छाननीत तीन अर्ज बाद झाल्यानंतर १५ उमेदवार निवडणुक रिंगणात होते.त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे बंडखोर पुणे जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद व माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत चुरस वाढली होती.

सोमवार(दि.७) रोजी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी बाबुराव पाचर्णे(भाजपा),अशोक पवार(राष्ट्रवादी), कैलास नरके(मनसे),चंदन सोंडेकर(वंचित बहुजन आघाडी),रघुनाथ पवार(बसपा), अमोल लोंढे( बहुजन मुक्ती पार्टी), चंद्रशेखर घाडगे(संभाजी ब्रिगेड), ज्ञानेश्वर कटके(अपक्ष),नरेंद्र वाघमारे(अपक्ष),नितीन पवार(अपक्ष),मंगलदास बांदल(अपक्ष),भरत गडदे(अपक्ष),रामलाल पुंगलिया(अपक्ष) असे वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे असुन या पैंकी प्रदिप कंद(अपक्ष),चंद्रकांत कोलते(अपक्ष), भरत गडदे(अपक्ष),मंगलदास बांदल(अपक्ष),ज्ञानेश्वर कटके(अपक्ष) या पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघासाठी दहा जण निवडणुकिच्या रिंगणात उभे आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीचे पुणे जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद व माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत चुरस वाढली होती.मोठे शक्तिप्रदर्शन करत प्रदिप कंद व मंगलदास बांदल यांनी मोठा मेळावा आयोजित केला होता.तर शिवसेनेचे कटके यांनीही वाघोली येथे शिवसैनिकांची आढावा बैठक आयोजित करत शक्तिप्रदर्शन केले.या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकितील चुरस कमी होउन दुरंगी लढतीवर हे चिञ थांबले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या