शिरुर-हवेलीत राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर...

Image may contain: 4 people, including Goraksh Dhumal and Jahirat Wala, people smiling, people standing and shoes
शिरुर, ता. ७ ऑक्टोबर २०१९ (वार्ताहर) : शिरुर विधानसभा मतदार संघ सोमवार हा उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस नाट्यपुर्ण घडामोडीने भरुन गेला होता.तर शिरुर हवेलीतील राजकिय गणिते बदलुन टाकणारा ठरला.

शिरुर हवेली १९८ विधानसभा मतदार संघात भाजपाकडुन अधिकृत उमेदवारी विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांना जाहिर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सर्वात चर्चेत असलेल्या माजी आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या पैकी कोणाला उमेदवारी मिळणार याची शिरुर-हवेलीत सर्वात जास्त उत्सुकता होती.परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडुन माजी आमदार अशोक पवार यांना उमेदवारी देण्यात आली.यानंतर नाराज असलेल्या कंद यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर अपक्ष म्हणून कंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता.त्यामुळे उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी कंद हे काय भुमिका घेतात याची उत्सुकता होती.

दरम्यान सोमवार(दि.७) रोजी अपेक्षेप्रमाणे कंद यांनी शिरुर तहसिल कार्यालयातील विशेष कक्षात दुपारी दोनच्या सुमारास शिवसेना,भाजपच्या शिरुर-हवेलीतील समर्थकांसह निवडणुक निर्णय अधिकारी यांच्यासमोर उपस्थित राहत उमेदवारी अर्ज माघारी घेतला.यानंतर आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या संपर्क कार्यालयात गेले.यावेळी संयुक्त पञकार परिषद घेउन समर्थकांसह आमदार बाबुराव पाचर्णे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहिर केले.तसेच राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच जाहिर प्रवेश करणार असल्याचे कंद यांनी सांगितले.

पुढे बोलताना कंद म्हणाले की आमदार राहुल कुल,गणेश बीडकर यांच्यासमवेत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली असुन मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देउन कोणतीही अपेक्षा न ठेवता उमेदवारी अर्ज माघार घेतला असल्याचे सांगितले.दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर कोणत्याही राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्याने संपर्क साधला नाही असे सांगून आमदार बाबूराव पाचर्णे यांना विक्रमी मतांनी विजयी करणार असल्याचे ते म्हणाले.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉग्रेस ला पक्षात असताना मी पक्षाचा उमेदवार बदला असे सांगितले होते, माञ हुकुमशाही पद्धतीने चाललेल्या राष्ट्रवादीत जुन्या नेत्याना पुन्हा संधी दिली. त्याच त्यांच मंडळीना किती वेळा संधी देणार असा सवाल उपस्थित करुन आगामी काळात पुणे जिल्हा परिषदेत चमत्कार होईल असे ते म्हणाले.

यावेळी आमदार बाबूराव पाचर्णे,माजी जि.प.,सदस्य शांताराम कटके,माजी पं.स.सदस्य माउली वाळके, वढुचे माजी सरपंच अनिल चोंधे,फुलगावचे माजी सरपंच सुनिल वागजकर, शिवसेनेचे संदिप भोंडवे, गणेश सातव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दादासाहेब कोळपे, किसान मोर्चाचे दादापाटील फराटे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, पोपट शेलार, राजेंद्र कोरेकर, शहरप्रमुख मयुर थोरात, रासपचे शिवाजी कु-हाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके, अप्पासाहेब बेनके, तुकाराम खोले, सागर पांढरकामे, रविंद्र कंद आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या