'भाजपा महायुती एकदिलाने निवडणूकीत काम करणार'

Image may contain: 1 person, sitting and indoorशिरुर, ता.१० ऑक्टोबर २०१९ (प्रतिनीधी) : आमदार बाबूराव पाचर्णे यांना बळ देण्यासाठी शिवसेनेसह महायुतीतील घटक पक्ष  एकदिलाने काम करणार असल्याचे घोडगंगा कारखान्याचे संचालक व शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार यांनी बोलताना सांगितले.

शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,रासप,आरपीआय,रयत क्रांती यांसह महायुतीतील घटक पक्षांची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी फराटे हे बोलत होते. यावेळी बोलताना फराटे यांनी सांगितले कि, गेल्या अनेक निवडणुकांत शिवसेना स्वतंञ लढलेली होती. परंतु यावेळी युतीधर्म पाळत आमदार बाबुराव पाचर्णे यांना बळ देण्यासाठी प्रथमच भाजपासोबत  निवडणुकित आहे. शिरुर तालुक्यातील शिवसैनिक या निवडणुकित कुठेही कमी पडणार नाही. सर्व ताकदीने पाचर्णे यांच्या पाठिशी राहु असेही ते म्हणाले.

यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर सर्वच पक्षांच्या प्रमुख पदाधिका-यांनी आप-आपल्या भुमिका मांडल्या. यावेळी सर्वांनी एकदिलाने गट-तट विसरुन पाचर्णे यांना विजयी करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे किसान मोर्चाचे दादापाटील फराटे, तालुकाध्यक्ष भगवान शेळके, रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग फराटे, रासपचे तालुकाध्यक्ष शिवाजी कु-हाडे, शिवसेनेचे पोपट शेलार, शिवाजी भुजबळ, शिवसेनेचे अनिल काशिद, शैलजा दुर्गे, विजया टेमगिरे, रोहिदास शिवले, संजय देशमुख, मयुर थोरात, हनुमंत लांडे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या