आमदारांचा विकास हा फक्त कागदोपत्री: अशोक पवार

Image may contain: 1 person, smiling, tree and outdoor
शिंदोडी, ता. 10 ऑक्टोबर 2019 (तेजस फडके): चासकमानचे पाणी म्हणजे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनदायी रक्तवाहिन्या आहेत; मात्र मागील साडेचार वर्षात आमदार बाबुराव पाचर्णे यांनी पाणीवाटपाचे मनमानी पद्धतीने नियोजन करत एक प्रकारे शेतकऱ्यांच्या या रक्तवाहिन्या गोठवण्याचाच प्रयत्न केला आहे. आमदारांचा विकास हा फक्त कागदोपत्री आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांनी केला.

शिरूर तालुक्यात हजारो कोटींचा विकास केल्याचा वल्गना करणाऱ्या आमदाराला शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असता अस्तरीकरणाचा प्रश्न मार्गी का लावला नाही? असा सवाल त्यांनी विचारला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने चव्हाणवाडी (ता. शिरूर) येथे ग्रामस्थांशी गावभेट दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष रवी काळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, खरेदी विक्री संघाचे संचालक शहाजी जासूद यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Image may contain: 5 people, crowd, wedding and outdoor
पवार म्हणाले,' आमदारांचा विकास हा फक्त कागदोपत्री असून, तालुक्याच्या विकासात भरीव योगदान देईल असे एकही काम झाले नाही. प्रत्यक्षात पाहिले तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे, पाण्याचे नियोजन नाही. विजेचे रोहित्र बिघडले तर शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते, शेतीला बाजारभाव नाही, सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढतेच आहे. अशी विदारक स्थिती तालुक्यात असताना आमदार मात्र वाळूचोरांना अभय देणे, पोलीस यंत्रणेला हाताशी धरून ठराविक व्यक्तींच्या मागे कायद्याचा ससेमिरा लावणे, स्वविकासाच्या आड येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे, आदी कामांतच व्यस्त होते.ज्यांना तुम्ही राजकारणात पदे दिली, मानसन्मान दिला, अशा तालुक्यातील नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी किती बी भुमिका बदलल्या तरी आम्ही चव्हाणवाडीकर तुमच्या पाठीशी आहोत. जनता जनार्दन सुज्ञ आहे असा विश्वास चव्हाणवाडीच्या ग्रामस्थांनी अशोक पवार दिला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या