लेडी सिंघम अधिका-याची रांजणगावला दबंग कारवाई

Image may contain: 4 people, people smiling, people standing and outdoorरांजणगाव गणपती, ता.११ ऑक्टोबर २०१९ (सतीश केदारी) : लेडी सिंघम म्हणुन दबदबा असणा-या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने बारामती गुन्हेशाखेच्या पथकासह केलेल्या कारवाईत ८ हॉटेल्सवर धाड टाकून अडीच लाख रुपयांचा दारुसाठा व माल जप्त केला आहे.

बारामतीचे अपर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळालीनुसार पोलीसांना रांजणगाव येथे अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या व बारामती गुन्हे शाखेच्या पथकाने रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील विविध हॉटेल्स व ढाबे यांच्यावर कारवाई केली.

यावेळी वेगवेगळ्या कंपनी च्या ब्लेंडेर प्राइड,मॅक्डोवेल्स, व्हिस्की, रम,  रॉयल स्टेग, वोडका, टूबर्ग बिअर, बुडवाईसर बिअर व इतर अश्या विदेशी व टंगो देशी दारूच्या अशा मिळुन 1,68,860 रु चा देशी विदेशी दारूचा अवैध माल सुमारे ६० बॉक्स, व 81,520 रु रोख रक्कम असे एकूण 2,50,380 रु चा माल जप्त केला.तर या प्रकरणी अक्षय सुखदेव कांबळे,अमित शहाजी जायकर,बाबासो गोविंद पवार, अजिंक्य दिलीप वाडकर, बाप्पू भरत शिंदे, दत्ता लक्ष्मण सुरवसे, मानस कुमार मुरलीधर जैना, आझाद  टेकराम सिंग यांना ताब्यात घेतले.

हि कारवाई सदर पोलीस अधिक्षक संदिप पाटील,अपर पोलीस अधिक्षक संदिप पाटील, जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी आयपीएस ऐश्वर्या शर्मा,बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार, राजेंद्र जाधव, रियाज शेख, जलद कृती दलाचे 10 पुरुष आणि 4 महिला जवान तसेच रांजणगाव चे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पो. हवा. दादा चमनशेख, पो.ना. प्रफुल्ल भगत, मंगेश थिगळे यांनी केली.

या कारवाईनंतर शिरुर व रांजणगाव पोलीस स्टेशनहद्दीत अनेकांचे धाबे दणानले असुन नागरिकांकडुन स्वागत  करण्यात येत आहे. शिरुर तालुक्यात शिक्रापूर, रांजणगाव, शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे जोरात सुरु असून सर्वच अवैध धंद्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. माञ, या पोलीसांकडून मोठी कारवाई केली जात नाही. आयपीएस अधिकारी व दौंड च्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी अचानक धाड शिरुर व रांजणगाव परिसरात यापुर्वीही टाकली होती. अशाच कारवाया यापुढेही सुरु ठेवण्याची नागरिकांची मागणी आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या