...म्हणून मला निवडणूक जिंकणे सहज शक्य: अशोक पवार

Image may contain: 5 people, crowd, wedding and outdoor
तळेगाव ढमढेरे, ता. 14 ऑक्टोबर 2019 (जालिंदर अदक): सर्वसामान्य जनता आणि तरुणवर्ग माझ्या मागे ठामपणे उभा असल्यामुळे मला निवडणूक जिंकणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन महाआघाडीचे उमेदवार अॅड अशोक पवार यांनी केले.

टाकळी भीमा (ता. शिरूर) येथे झालेल्या सभेत शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड अशोक पवार यांच्या प्रचारार्थ पवार पुढे म्हणाले, 'मी आमदार असताना सर्वसामान्य जनतेच्या मोठ मोठ्या दवाखान्यात मोफत उपचार केले आहेत. विजवीतरण खात्यातील नादुरुस्त रोहित्र झाल्याबरोबर ४८ तासांमध्ये दुसरे रोहित्र जागेवर बसत होते, आता परिस्थिती तशी राहिली नाही एक महिना- महिना नागरिकांना अंधारात बसायची वेळ आली आहे. सर्वसामान्य जनतेची कामे अनेक वर्ष प्रलंबित आहेत कोणत्याही प्रशासनावर पकड नसल्यामुळे संपूर्ण जनता वैतागली आहे, या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, गेल्या पाच वर्षात साधी दुरुस्ती केली नाही, केलेल्या रस्त्यांची गुणवत्ता ढासळलेली आहे. झालेली कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहे हे जनतेला भाजप सरकारने फसवले आहे, आता जनता त्यांना माफ करणार नाही.'

यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, काँग्रेसचे नेते महेश ढमढेरे, घोडगंगेचे संचालक शिवाजी वडघुले, आदर्श सरपंच विकास शिवले, संतोष दौंडकर, राजेंद्र सात्रस, पोलीस पाटील प्रकाश करपे, युवा नेते माऊली थेऊरकर, सुभाष वडघुले, विजय वडघुले, शहाजी काळे, उमेश काळे, माऊली ढोरे, अमोल काळकुटे, दर्शन धुमाळ, मधुकर वडघुले, नितीन वडघुले, विठ्ठल वडघुले, बजरंग वडघुले, विशाल पाटोळे, रोहिदास वडघुले, मनोज वडघुले, संजय कामठे, साहेबराव काळे यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी सांगितले होते की, 'जो कारखाना विज प्रकल्प तयार करेल त्याला पुढील दहा वर्षे पर्चेस टॅक्स माफ केला जाईल, एका वर्षाला सात ते आठ कोटी टॅक्स सूट मिळत होता असे दहा वर्षात ८० कोटी टॅक्स मिळाला या सरकारच्या काळात या टॅक्सवर जीएसटी लावण्यात आली यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास संपूर्ण कर्जमाफी आणि तरुण बेरोजगारांना महिन्याला पाच हजार रुपये दिले जाणार आहे, तसेच ६५ वर्षीय महिलेचा पंधराशे रुपये महिन्याला भत्ता दिला जाणार आहे.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या