Video: पाचर्णे यांच्याकडून आमच्या गावाला निधी नाही...

Image may contain: 4 people, people standingमांजरेवाडी, ता. 14 ऑक्टोबर 2019 (तेजस फडके): शिरूर-हवेली मतदार संघातील शेवटच्या टोकाचे गाव मांजरेवाडी हे विकास कामापासून वर्षानुवर्षे वंचित असल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपळे जगताप शेजारील आणि शिरूर आणि खेड तालुक्याच्या सीमेवर असलेले हे मांजरेवाडी हे गाव अनेक वर्षांपासून वंचित असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. ३५० लोकसंख्या असलेले हे गाव वाजेवाडी ग्रामपंचायतला जोडलेले आहे. वाजेवडी आणि मांजरेवाडी एकत्र ग्रामपंचायत आहे. मात्र, निधी कोणताही निधी मिळाला तर तो फक्त वाजेवाडीच्याच ग्रामस्थांना त्याचा फायदा होतो. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर कागदोपत्री तीस फूट रस्ता मिळाला. मात्र, प्रत्यक्षात मात्र तो आठ फुटच झाला आहे, त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
पाणीपुरवठा योजना फक्त नावपूर्तीच गावाच्या डोक्यावर आहे. पाणी आणि पाईप मात्र गायब आहेत. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आहे, शाळेच्या वर्गखोल्या आहेत. मात्र, त्याला अनेक वर्षांपासून रंग नाही. आरोग्याची मोठी समस्या आहे, जवळ आरोग्य केंद्र नाही. पिंपळे जगताप हे गाव आमचा मोठा भाऊ आहे तर आम्ही छोटे भाऊ आहोत. वाजेवाडी आणि पिंपळे जगतापला निधी मिळतो. मात्र, आमच्या गावाला कसलाही निधी भाजपचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यामार्फत मिळाला नासल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या